नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे (Tesla chief Elon Musk has finally bought Twitter). या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये झाला आहे.
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी एलोन मस्कसोबत झालेल्या कराराच्या दरम्यान, ट्विटरने सांगितले की अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती खाजगी मालकीची कंपनी बनेल. दरम्यान, टेस्ला चीफचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटनंतर दोन्ही कंपन्यांमध्ये डील झाल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक इलॉन मस्क यांचा ट्विटरवर पूर्ण ताबा आला आहे.
माझे सर्वात वाईट टीकाकार देखील ट्विटरवर राहतील
दरम्यान, इलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे की, “मला आशा आहे की माझे सर्वात वाईट टीकाकार देखील ट्विटरवर राहतील, कारण मुक्त भाषणाचा खरा अर्थ असाच आहे.” मस्कचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.