विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षितेतसाठी पुण्यातील शिक्षणसंस्था घेणार पुढाकार : गुरुवारी (दि. २९ ऑगस्ट) शिक्षण संस्थाचलकांची बैठक

विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षितेतसाठी पुण्यातील शिक्षणसंस्था घेणार पुढाकार
विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षितेतसाठी पुण्यातील शिक्षणसंस्था घेणार पुढाकार

पुणे : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्याच्या हेतूने पुण्यातील नामवंत शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांची एक महत्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पुण्यातील अधिकाधिक शिक्षणसंस्थांचे चालक, विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात पूर्वतयारीसाठी दि. २४ ऑगस्ट रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, भारतीय विद्या भवन, पुणे सेवा सदन सोसायटी, जोग एज्युकेशनल ट्रस्ट आणि सिंबायोसिस अशा ९ संस्थांचे एकूण १७ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

अधिक वाचा  अण्णाभाऊंना ‘भारतरत्न' मिळण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार, विनोद तावडे यांची ग्वाही

या संदर्भात अधिक माहितीसाठी श्रीरंग कुलकर्णी (मोबाईल क्र. – ९५६०४०००९५) व दीपक काळे (मोबाईल क्र. – ७९७२२४३५२५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love