मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : दत्तात्रय भरणे यांनी केली धनंजय मुंडे यांची पाठराखण

दत्तात्रय भरणे यांनी केली धनंजय मुंडे यांची पाठराखण
दत्तात्रय भरणे यांनी केली धनंजय मुंडे यांची पाठराखण

पुणे(प्रतिनिधि)– बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्याने मंत्री धनंजय मुंडेच्या अडचणी वाढल्याची चर्चा असतानाच क्रीडा खात्याचा पदभार अजूनही न स्वीकारलेले मंत्री दत्तामामा भरणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. अनेक मंत्र्यांचे मित्र असतात त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणे कितपत योग्य आहे? असा सवाल करत बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कराडचा हात असल्याचा आरोप केला जातो आहे, दरम्यान याप्रकरणी राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

अधिक वाचा  भविष्यात भाजप- सेनेची युती होऊ शकते- गिरीश बापट

पुण्यात  माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे, तपास सुरू आहे. काल वाल्मीकजी कराड शरण गेलेले आहेत. या प्रकरणातील दोषींवरती १०० टक्के कारवाई केली जाईल. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, धनंजय मुंडे आमचे नेते आहेत आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो, मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या नेत्याच्या मित्रांनी केलं म्हणजे त्यात त्याचा काहीतरी दोष असतो असं नाही.  ते तपासामध्ये सगळं समोर येईल म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. धनंजय मुंडे यांचा त्यामध्ये कोणताही संबंध नसावा, हे मला वाटतं असं म्हणत दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांचे पाठराखण केली.

मी नाराज नाही

मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये बरेच राजकारण तापले.  अजित पवारांचे विश्वासू शिलेदार इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा होती. भरणे यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यातच भरणे त्यांच्या कुटुंबासह परदेशात सुट्टीवर गेल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिकच उधाण आले.दरम्यान, आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दत्ता भरणे यांनी दिले. तसेच पुढील आठवड्यात मुंबईला जाऊन पदभार स्वीकारणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

अधिक वाचा  २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल - सुनील कडलग

भरणे म्हणाले, मी अजिबात नाराज नव्हतो. मी परदेशात गेलो होतो. १० वर्षे मी बाहेर गेलो नव्हतो. आता कुठे गेलो तर लगेच नाराज वगैरे म्हणणे योग्य नाही.  मलाही शेवटी भावना आहे. गेली दहा वर्षे मी पण आमदार होतो. मी कुठेही परदेशात गेलो नव्हतो. मलाही वाटतं परदेशात जावं. बाहेर आमचेही मित्रमंडळी आहेत. कॉलेजचे मित्रमंडळी बाहेर आहेत. त्यांचा खूप दिवसांचा आग्रह होता. त्यामुळे मी बाहेर गेलेलो.  मी नाराज असल्याच्या कुठल्याही गोष्टीत तथ्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love