वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना महाडमधून अटक : मनोरमाची झाली इंदुमती, पण पोलिसांनी शोधलंच…

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना महाडमधून अटक
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना महाडमधून अटक

पुणे(प्रतिनिधि)— स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्या प्रकरणी फरार झालेल्या मनोरमा खेडकर हिला रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक करण्यात आली. दरम्यान, मनोरमा खेडकर हिला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना मनोरमा  खेडकरने बाऊन्सर व पिस्तुलच्या धाकाने धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत संबंधित शेतकऱ्यांची वर्षानंतर तक्रार दाखल करून घेत पौड पोलीस ठाण्यात पूजाच्या आईवडीलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला. यानंतर पसार झालेल्या मनोरमा खेडकर यांच्या मागावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक (एलसीबी) होते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून त्यांना ताब्यात घेऊन पुण्यात आणून अटक केली.

अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. चौकशीसाठी जेव्हा पुणे पोलीस खेडकरांच्या घरी गेले तेव्हा खेडकर या घरी नव्हत्या, त्यामुळे खेडकरांच्या घराबाहेर नोटिस देखील लावण्यात आली होती. पुणे पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले होते, अखेर महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि  पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झालं. त्यानंतर खेडकरला अटक करून पौड पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं.

अधिक वाचा  सामाजिक जबाबदारीने गणेशोत्सव मंडळ कार्यरत राहतील : विनय कुमार चौबे :

मनोरमा खेडकरची झाली इंदुमती ढाकणे पण पोलिसांनी शोधलंच…

मनोरमा खेडकर हिच्या अटकेबद्दल माहिती देताना पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख म्हणाले,मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी आज (गुरुवार) किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी इथून अटक केली. मनोरमा खेडकर आणि त्यांच्या सोबत एक व्यक्ती रात्री ९.३० वाजता हिरकणी वाडी इथ आले. तेथील पार्वती हॉटेल इथं बनावट नावाने राहिल्या. दादासाहेब ढाकणे व इंदुताई ढाकणे अशी नावे त्यांनी मालकाला दिली. तसे आधारकार्ड  देखील दाखवले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीस हिरकणी वाडी इथं पोहोचले. त्यांनी इथल्या सर्व लॉजेसची कसून तपासणी केली. अखेर मनोरमा खेडकर ज्या हॉटेल मध्ये राहिल्या होत्या तेथे पोहोचले. मनोरमा खेडकर याच ठिकाणी राहत असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी ६.३०  वाजता त्यांना ताब्यात घेवून त्यांना पौड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस मनोरमाला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने  मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अधिक वाचा  प्रामाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्वविकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार : अजित गुलाबचंद : निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना मनोरमा खेडकर यांच्याकडून पिस्तूल जप्त करायचे आहे. मनोरमा खेडकर यांनी ज्या जमीनीवररुन वाद घातला त्या जमीनीची कागदपत्रे तपासायची आहेत. सकाळी सव्वा नऊ वाजता महाडमधून अटक केली आहे. ⁠पिस्तुल रिकव्हर करायचे आहे. ⁠गुन्ह्यात वापरलेली लँड क्रुझर गाडी ताब्यात घ्यायची आहे. आरोपी प्रभावशील व्यक्ती आहे. फिर्यादींवर दबाव आणू शकतात. ⁠इतर आरोपींना अटक करायची आहे.⁠आरोपींची मुळशी तालुक्यात इतरही ठीकाणी मोठी जमीन आहे. या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आहे का? याचा तपास करायचा आहे.  ⁠त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी. मिडीया रिपोर्टस पाहून  व्हायरल व्हिडीओ पाहुन खेडकर यांच्या विरोधात तक्रार देण्याचे बळ आले. म्हणून त्यांनी एक वर्षाने तक्रार दिली. ⁠फिर्यादी पासलकर यांच्यावर दबाव होता. म्हणून ते तक्रार देत नव्हते.

त्यावर आरोपीचे वकिलांनी युक्तिवाद करताना म्हणाले, आम्ही जमीन २००६ ला खरेदी केली आहे. ⁠पिस्तुलाचे लायसन्स आहे.आतापर्यंत आरोपीवर एकही गुन्हा नाही. ⁠३०७ कलम काल अचानक ॲड करण्यात आले आहे. ⁠त्याधीचे सर्व कलम जामीनपात्र  आहेत. ⁠आम्ही तपासात सहकार्य करु. या प्रकरणी खेडकर यांच्या तक्रीवरुन पासलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. ⁠या गुन्ह्यात पोलीसांनी तपास करुन चार्ज शीट दाखल केले आहे.⁠ असे, असताना एक वर्षाने पुन्हा त्याच घटनेत खेडकर यांना आरोपी करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टस पाहून एक वर्षाने तक्रार देण्यात आली आहे. ⁠एक वर्षाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे कारण ही पोलीसांनी दिलेले नाही. ⁠एक वर्षापुर्वी खेडकर यांनी या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे. त्यांचे म्हणणे दिले आहे. २४ वर्षे खेडकर पिस्टल वापरत आहेत. मागील २४ वर्षात पिस्टलवरुन एकही गुन्हा किंवा तक्रार नाही. ⁠आम्ही पिस्टल आणि लायसन्स सरेंडर करायला तयार आहोत. कोर्टाला मोबाईलवरील मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ दाखवला जात आहे. पासलकर यांचे आठ लोक घटनास्थळी उपस्थित होते त्यामुळे त्यांनी पिस्टल हातात ठेवणे गैर नाही. ⁠घटनेच्या आदल्याच दिवशी खेडकर यांची गाडी आडवण्यात आली होती. त्यांना धमकावण्यात आले होते. आदल्या दिवशी खेडकर यांनी पौड पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पिस्टल बरोबर ठेवले होते.

अधिक वाचा  साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४ जाहीर

नवीन कलम वाढ झाल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढण्याची शक्यता

मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम ३०७ वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन कलम वाढ झाल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love