#Ram Janmabhoomi Movement: अयोध्या, काशी आणि मथुरा मुक्ततेसाठी पहिल्यांदा या कॉँग्रेस नेत्याने 1983 मध्ये पुकारला होता एल्गार

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

Ram Janmabhoomi Movement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) व विश्व हिंदू परिषद(VHP) या संघटना रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनात(Ram Janmabhoomi Movement) प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या नव्हत्या. परंतु मुझफ्फरनगर(Muzaffarnagar) येथे मार्च १९८३ मध्ये झालेल्या हिंदू संमेलनात(Hindu Conference) काँग्रेसचे नेते श्री. दाऊदयाल खन्ना(Dawoodyal Khanna)  यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून“अरे हिंदूंनो, काशी(Kashi), मथुरा(Mathura) आणि अयोध्या(Ayodhya) या स्थानांना मुक्त करण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन केले आणि हा विषय पुढच्या काळात विश्व हिंदू परिषदेने(VHP) हाती घेऊन हिंदू समाजात(Hindu Society) जागृती करावी असेही निश्चित करण्यात आले. (This Congress leader called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983)

त्यानंतर हा विषय समजून घेण्यासाठी मा. अशोकजी सिंघल( Ashokji Singhal)  श्री. दाऊदयाल खन्ना यांच्या घरी गेले. त्यांनी हा विषय समजून घेतला, तेव्हा अशोकजींच्या असे लक्षात आले की, रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी संघर्ष करायचा असेल तर तो दीर्घकाळ चालेल. विश्व हिंदू परिषदेने त्यात सहभाग घेण्याचे ठरवले. श्री. दाऊदयाल खन्ना यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला व ते देखील या संघर्षात सक्रियपणे सामील झाले.

अधिक वाचा  हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन- डॉ. मोहन भागवत

अयोध्येतील साधु-संतांबरोबर बैठक घेऊन रामजन्मभूमी मुक्ती यज्ञासाठी एक समिती स्थापन करण्याचे ठरले. ‘श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’ असेच तिचे नामकरण करण्यात आले. गोरखपूर येथील गोरक्ष मठाचे पीठाधीश व उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु महंत अवैद्यनाथ महाराज यांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, श्री. दाऊदयाल खन्ना महामंत्री बनले व या समितीचे काम सुरू झाले. मा. अशोक जी सिंघल यांच्याकडे कोणतेच पद नव्हते, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने रामजन्मभूमी मुक्तीच्या संघर्षाला वेग मिळाला.

विश्व हिंदू परिषदेने हे कार्य हाती घेतले व दि. ७ एप्रिल १९८४ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे धर्म संसदेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले. हे अधिवेशन या लढ्याची नांदी ठरली. विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेऊन ‘विराट हिंदू समाज’ नावाच्या व्यासपीठाचे आयोजन केले व या माध्यमातून कामाला सुरवात केली. पुढच्या काळात दि. ७ ऑक्टोबर १९८४ हा दिवस देशभर ‘श्रीरामजन्मभूमी मुक्ती संकल्प दिवस’ म्हणून पाळून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. या आंदोलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी सीतामातेचे जन्मगाव मानल्या जाणाऱ्या बिहारमधील सीतामढी या गावातून एक रामरथ अयोध्येला आणण्यात आला. दि. ७ ऑक्टोबर १९८४ रोजी देशभरातून हजारो साधू-संत अयोध्येला पोहोचले. शरयू नदीच्या तीरावर सुमारे पन्नास हजार लोकांनी रामजन्मभूमी मुक्तीची शपथ घेतली. दि. ८ ऑक्टोबरपासून अयोध्या ते लखनऊ अशी १३५ किलोमीटर लांबीची धर्मयात्रा काढण्यात आली. ही यात्रा दि. १४ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये पोहोचली व त्या ठिकाणी एक विशाल सभा झाली. या सभेसाठी आलेल्या लाखो लोकांना घराघरातून भोजन देण्याची सोय करण्यात आली होती. लाखो लोक या संघर्षाशी जोडले गेले.                 

अधिक वाचा  स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची :भाग – ५ : साधू, संन्यासी व बैराग्यांची नगरी - अयोध्या 

रथयात्रा लखनऊमधून निघून नैमिषारण्यमार्गे दि. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी नवी दिल्लीत पोहोचणार होती व तिथे लाल किल्ल्यासमोर एक विराट जनसभा होऊन समारोप होणार होता व त्यानंतर डिसेंबर १९८४ पासून साऱ्या देशात जनजागरण मोहीम सुरू करावी हे निश्चित करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने दि. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची हत्या झाली, देशभर प्रचंड हिंसाचार सुरू झाला व अस्थिरतेचे वातावरण लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषदेने आपली जनजागरण मोहीम व आंदोलन काही काळाकरता स्थगित केले. परंतु विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन हाती घेतल्यानंतर त्याचे रूपांतर लोक चळवळीत झाले हे मात्र निश्चित.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love