इयत्ता दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर : या तारखेपासून होणार अर्ज भरण्यास सुरुवात

इयत्ता दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर
इयत्ता दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर

पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  येत्या ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत, या संदर्भातील परिपत्रक राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केले आहे.

राज्य मंडळाच्या सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी प्रणालीवरील ‘स्कूल प्रोफाईल’मध्ये शाळा संस्था मान्यता, विषय शिक्षक या बाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत घेऊन विद्यार्थ्यांकडून अर्जात नमूद केलेली माहिती पडताळून ती अचूक असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. पडताळणी केल्याबाबत विद्यार्थी, मुख्याध्यापकांना स्वाक्षरी करावी लागणार आहे. माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क भरणे, शुल्क भरल्याचे चलन, विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.

अधिक वाचा  कौशिक आश्रमच्या शिबिरात ५२६ जणांचे रक्तदान

इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत. संबंधित अर्ज हे शाळेमार्फत भरून घेतले जाणार आहेत. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेस मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद करणे आवश्यक आहे.तसेच सरल डेटाबेस वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेत प्रविष्ट होणारे विद्यार्थी आयटीआयचे विद्यार्थी यांची माहिती सरल डेटाबेस मध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांमध्ये भरावयाची आहेत.

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love