‘अब्दुल सत्तार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

‘अब्दुल सत्तार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले
‘अब्दुल सत्तार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

पुणे(प्रतिनिधि)—‘अब्दुल सत्तार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह दणाणून गेले. विशेष म्हणजे राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी यांनी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात या घोषणा दिल्या.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी (दि. ३) निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते.

अधिक वाचा  ब्रिगेडीअरही अडकला सायबर चोरट्यांच्या जाळ्यात : फेक शेअर्स ट्रेडिंग मध्ये फसले अन बसला ३१ लाखांचा गंडा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा-एकच्या परवानगीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगताच पणनमंत्री अब्दुल सत्तार संतापले. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका असे म्हणत माइकचा ताबा घेतला. उपस्थित सभापतींनी पदाधिकाऱ्यांना बोलू देण्याची विनंती करताच मंत्री सत्तार यांनी मला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. त्यामुळे संतापलेल्या बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी अब्दुल सत्तार यांचे करायचे काय. खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह दणाणून सोडले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ज्या

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love