अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ हिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…


पुणे- “ट्रोल करणाऱ्या मंडळींना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?” असे प्रश्न संतप्त झालेल्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित करत ट्रोल करणाऱ्यांना फटकारले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी “किती दिवस आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत, तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही?” असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला आहे. ‘ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, त्यावर इतक्या घाणेरड्या कमेंट्स आल्या’, असं म्हणत याकडे चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

अधिक वाचा  'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते'चे हे पुस्तक जनतेला, राजकीय नेत्यांना, राजकीय सामाजिक जीवन शिकविणारा दस्तऐवजच - अजित पवार

“एक अतिशय साधा पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ हेमांगीने पोस्ट केला होता. त्यावर इतक्या घाणेरड्या पद्धतीने कमेंट्स आल्या. म्हणजे लोकांची जी नजर आहे, ती सुधारण्याचे नावच घेत नाही. इन्स्टाग्राम हे एक मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म आहे. त्यावर वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या प्रकारची गाणी घेऊन ती येत असते. त्या पोळ्या लाटण्याच्या छोट्याशा इन्स्टाग्राम पोस्टवरुन, त्याच्यावर नजर न टाकता, नको त्या गोष्टींवर बारीक रितीने पाहणं, त्यावर अश्लील लिहिणं, म्हणजे लोकांनी सगळ्या पातळ्या सोडलेल्या आहेत” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. ही ट्रोलर्स मंडळी बऱ्याच अभिनेत्रींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतकी अश्लील आणि घाणेरड्या कमेंट्स लिहितात, की त्या मुली ही वाचू शकणार नाहीत, पण या गोष्टीला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love