छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण : राष्ट्रवादीला आणखी एक धक्का


पुणे- राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री कोरोना पॉझिटीव्ह होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोना पॉसिटीव्ह झाले आहेत. आता नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

नाशिकचे पालकमंत्री असलेले भुजबळ यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल नाशिक जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे पांच वाजेपर्यन्त संचारबंदीची घोषणा केली होती. तसेच मास्क न वापरणाऱ्याकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, भुजबळ यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2-4 दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  खासदार गिरीश बापट यांचे निधन