कोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर

पुणे- सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातून कोण होणार करोडपातील चांगला प्रतिसाद मिळत आहे , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत . हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकांशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक अर्थबळ देत आहेत. […]

Read More

अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ हिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…

पुणे- “ट्रोल करणाऱ्या मंडळींना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?” असे प्रश्न संतप्त झालेल्या […]

Read More

सोनी मराठीवर नवीन मालिका क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची

पुणे -आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून  रात्री १० वा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत […]

Read More

राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रने दिली गुड न्यूज : सावनी म्हणाली…

पुणे -राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रवींद्र’ने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत. ती लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. तिच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद […]

Read More

‘तू सौभाग्यवती हो’:सूर्यभान अल्लड ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का?

पुणे–सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो‘ ही प्रेक्षकांना आवडू लागली आहे, अल्लड ऐश्वर्या  आणि करारी सूर्यभान यांची ही हळुवारपणे फुलत जाणारी प्रेम कहाणी आता रंगू लागली आहे. प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाला घेऊन काही स्वप्न असतात तशीच ऐश्वर्याची सुद्धा आहेत पण ऐश्वर्याचं हे लग्न चारचौघींसारखं नाही तर आगळंवेगळं आहे. वयाच्या, सामाजिक दर्जाच्या एकंदर सीमा ओलांडून […]

Read More

जेष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ (बाबा चमत्कार) यांचे निधन

पुणे -झपाटलेला आणि झपाटलेला 2 या चित्रपटातून ‘बाबा चमत्कार’ ही व्यक्तिरेखा साकारणारे जेष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. कडकोळ यांना नौदलात भरती व्हायचे होते. ते परीक्षाही पास झाले. सगळे सुरळित सुरु असताना मेडिकल टेस्ट केली असता त्यांच्या कानात दोष असल्याचे कारण देत त्यांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी […]

Read More