जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे पाचव्या जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, खो-खो, तायक्वांदो, रिले यांसारख्या सांघिक आणि बुध्दीबळ, धावणे, कराटे यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मराठी, इंग्रजी माध्यमातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष […]

Read More

पुण्यात होणाऱ्या ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत २२ ग्रँडमास्टर्स, ६ महिला ग्रँडमास्टर्सचा सहभाग

पुणे : येत्या ८ ते १२ मार्च दरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)च्या वतीने पुण्यात होणाऱ्या ३२ व्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत २२ ग्रँडमास्टर्स, ६ महिला ग्रँडमास्टर्स सहभागी होणार असून पीवायसी हिंदु जिमखाना या ठिकाणी सदर स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पश्चिम विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक अजित धाकरस […]

Read More

खेळाबरोबर शिक्षण अत्यंत महत्वाचे : आयरनमॅन कौस्तूभ राडकर यांचा सल्ला

पुणे- जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळा बरोबर शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. कठिण परिश्रम, खिलाडीवृत्ती व आनंदाने खेळ खेळल्यास यश त्याचा पदरी पडते. त्यामुळे खेळ आणि शिक्षण कधीही सोडू नका. असा सल्ला ३३ वेळा आयरनमॅन ट्रायथलॉन झालेले कौस्तूभ राडकर (kaustubh Radkar) यांनी खेळाडूंना दिला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६वी राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धा एमआयटी […]

Read More

प्रदक्षिणा मार्गावर उद्या रंगणार शिवनेरी मॅरेथॉनचा थरार : ११०० धावपटू सहभागी होणार

जुन्नर : शिवजयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय शिवनेरी मॅरेथॉनचा थरार  उद्या पहाटे (ता.१२) शिवनेरी प्रदक्षिणा मार्गावर रंगणार आहे. राज्यभरातील अनेक नामवंत धावपटूंसह 1100 धावपटू या मॅरेथॉनसाठी जुन्नरमध्ये दाखल झाले आहेत. खास या मॅरेथॉनसाठी इथोपियातूनही धावपटू दाखल झाले आहे. शिवनेरी किल्ला पायथ्याला रविवार, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पहाटे 6.30 वाजता आमदार अतुलशेठ बेनके, पोलिस महानिरिक्षक दिलीप भुजबळ […]

Read More

नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी : सोलापूरचा महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी

पुणे(प्रतिनिधि)-मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नांदेडच्या शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आसमान दाखवत मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. अत्यंत उत्कंठा निर्माण करणाऱ्या लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले आणि मैदानावर एकच जल्लोष झाला. महाराष्ट्र राज्य […]

Read More

महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख माती विभागातून तर हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे गादी विभागातून अंतिम फेरीत : माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा धक्कादायक पराभव

पुणे-महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा दावेदार असून त्यामध्ये […]

Read More