पण बाडगा मोठ्याने बांग देतो : का आणि कोणाला म्हणाले असे संजय राऊत?


मुंबई- काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार shrad pawar यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरून आता राजकीय खडाजंगी सुरू झाली आहे.  कालचा प्रकार हे आंदोलन नव्हतं तर हा हल्ला होता आणि या हल्ल्याचा समर्थन राष्ट्रवादी मधून भाजपामध्ये आलेले लोक करत होते असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत sanjay raut यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे. तुम्ही उपरे आहात. ज्या शरद पवारांनी, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, त्याच्याविरोधात तुम्ही असं बोलता? पण बाडगा मोठ्याने बांग देतो, तो प्रकार आम्ही काल पाहिला असा टोला राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले udayanraje bhosale यांचे नाव न घेता लगावला.

अधिक वाचा  हरियाणात भाजपची हॅट्रिक : कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून विजयाचा मोठा जल्लोष

अॅड. गुणरत्न सदावर्ते adv. gunratna sadavarte यांना कुणाचं पाठबळ आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यांना भाजपचा पाठबळ आहे असा आरोप करत ते कुणाच्या घरात राहतात त्यांना आर्थिक पाठबळ कोणाचे आहे? हे समोर येत आहे आणि त्यातलाच प्रकार कालचा होता असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.  संजय राऊत यांनी आज शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले आंदोलन करणं हा एक वेगळा प्रकार असतो. परंतु, कालचा तो प्रसंग जो होता ते वेगळे कटकारस्थान होतं. ते आंदोलन नव्हतं तर तो एक हल्ला होता.  या हल्ल्याचे समर्थन महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील लोक करत आहेत हा दळभद्रीपणा आहे.  परंतु, अशा पद्धतीने ते सरकारला अडचणीत आणू शकत नाही. तुमची बेअब्रू होते असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. महाराष्ट्रासाठी प्रचंड योगदान असलेल्या शरद पवारांसारख्या नेत्याच्या घरावर अशा पद्धतीने हल्ला करणं किंवा अशा पद्धतीने हल्ला करायला लावणं हे अत्यंत निंदनीय आहे.  हे पाप हे कुठे फेडणार असा प्रश्न आहे असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच: बावणकुळेंचा हल्लाबोल

सदावर्ते याला पूर्णपणे भाजपाचाच पाठिंबा असून शरद पवार यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळ पुरवलं जात आहे.  कालचा हल्ला हा त्याचाच भाग होता हे आम्ही जो तपास करत आहोत त्यातून सिद्ध झाला असल्याचा दावा आरोप राऊत यांनी केला आहे.

कालच्या भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या तर, कालपर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते ते आज भाजपमध्ये गेलेत ते पवार यांच्याविरुद्ध गरळ ओकत होते हे लक्षात येईल. विशेष म्हणजे ते या हल्ल्याचे समर्थन करत होते हा अत्यंत हलकटपणा आहे अशी टिप्पणी त्यांनी केली.  ज्या पक्षाने आणि ज्याने तुम्हाला मोठे केलं त्याच्याविरोधात तुम्ही असं बोलता? तुम्ही मूळचे भाजपवाले आहात का ?नाही ना? असा सवाल करत पण, ज्या शरद पवारांनी, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं. तुम्ही उपरे आहात, पण बाडगा मोठ्याने बांग देतो, तो प्रकार आम्ही काल पाहिला असा टोला त्यांनी खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता लगावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love