चाकणमध्ये उद्योजकावर गोळीबार : एक गोळी पोटात तर एक गोळी घुसली पाठीत

चाकणमध्ये उद्योजकावर गोळीबार
चाकणमध्ये उद्योजकावर गोळीबार

पुणे(प्रतिनिधि)— चाकणमध्ये वराळे परिसरात असणाऱ्या एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीत सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली. येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार  करण्यात आला आहे. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागलेली आहे. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन् त्यांनी कंपनीच्या गेटवरुनच कंपनीच्या मालकांवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अधिक वाचा  पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी

खंडणीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, जखमी असलेल्या कंपनी मालकांनीही तशी मागणी कोणाकडूनही झाली नसल्याचे म्हटले. आरोपींच्या शोधासाठी पोलीस व गु्न्हे शाखेचे १० ते १२  पथक कार्यरत झाले आहेत. कंपनीचे मालक प्रत्यक्ष जखमी, व कंपनीतील इतरांशी आम्ही चौकशी केली असून हा हल्ला खंडणी किंवा व्यवसायातून झालेला नाही असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे, याप्रकरणात हल्लेखोराचा नेमका हेतू काय, याचा तपास आम्ही करत असल्याचे पिंपरी चिंचवडचे डीसीपी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

 

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love