अटक केलेल्या मेफेड्रॉन ड्रग्ज माफियांचे बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन?

क्राईम
Spread the love

पुणे— पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, पाच लाख रुपये किमतीची कार आणि 23 हजार 100 रुपयांची रोकड असा एकूण 20 कोटी पाच लाख 23 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या टोळीचे बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातून वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स पकडले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. संबंधित टोळीचे मुंबईमधील बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे

चाकण परिसरातील शिरूर – चाकण मार्गावरून अज्ञात मोटारीने काही व्यक्ती मेफेड्रोन ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, संबंधित ठिकाणी सापळा लावण्यात आला. परंतु आरोपी यांनी मोटार थांबवली नाही. त्यांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला आणि शेल पिंपळगाव येथे त्यांना पकडले, पाच ही आरोपीकडे असलेल्या बॅगेत 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स आढळले. या कारवाईमध्ये आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

आरोपी संजीवकुमार बन्सीराऊत आणि तौसिफ हसन मोहम्मद तस्लिम दोघे ही नोएडा येथे राहण्यास असून ते विमानाने पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर इतर आरोपींशी सम्पर्क करून एकत्रित आले. दरम्यान, पुणे येथील पासिंग असलेल्या मोटारीतून मुंबईला हे सर्व मेफेड्रोन ड्रग्स विकण्यासाठी जाणार होते. मात्र, त्या अगोदरच त्यांचा पर्दाफाश करत 20 कोटींचे ड्रग्स पोलिसांनी पकडले आहे. या मेफेड्रोन ड्रग्सची प्रत्येकी 1 ग्रॅमची किंमत ही 10 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मेफेड्रोन ड्रग्स हे केमिकल फॅक्टरीमध्ये बनवले जाते आणि संबंधित आरोपी हे त्याच्याशी निगडित आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *