इंदिरा विद्यापीठाच्या नियामक मंडळावर भारती काळे यांची नियुक्ती

इंदिरा विद्यापीठ पुणे नियामक मंडळ सदस्य भारती दिपक काळे नियुक्ती
इंदिरा विद्यापीठ पुणे नियामक मंडळ सदस्य भारती दिपक काळे नियुक्ती

पुणे- इंदिरा विद्यापीठ, पुणे या विद्यापीठाच्या नियामक मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हाळसाकांत ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापिका भारती दिपक काळे यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आलेली असून त्याबाबत दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी शासन निर्णय जारी केलेला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/ई-११३०१७/विशि-४ शासन नियुक्ती आदेश जारी केला असून यामध्ये शासनाने नामनिर्देशित करावयाच्या दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून यामध्ये सहाय्यक प्राध्यापिका भारती दिपक काळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०२३ मधील कलम २७ मध्ये नियामक मंडळाची तरतूद आहे. कलम २७ (१) (ड) राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्तींचा नियामक मंडळात सदस्य म्हणून अंतर्भाव करण्याची तरतूद विहीत करण्यात आली आहे. या  तरतूदीनुसार इंदिरा विद्यापीठ, पुणे या विद्यापीठाच्या नियामक मंडळावर राज्य शासनाकडून दोन सदस्यांना नामनिर्देशित केले आहे.

अधिक वाचा  अनिल कपूरचा यांच्या या चित्रपटाला झाली २४ वर्षे : या चित्रपटात केली होती त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनसोबत स्क्रीन स्पेस शेअर

सहाय्यक प्राध्यापिका भारती दिपक काळे या म्हाळसाकांत ज्युनिअर कॉलेज, आकुडी येथे कार्यरत राहून अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय भाग घेतात. तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अनेक वर्ष योगदान असून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांनी लौकिकता प्राप्त केलेली आहे. त्यांच्या नियुक्ती बाबत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. इंदिरा विद्यापीठाच्या नियामक मंडळावरील शासन नियुक्त सदस्य पदी निवड झाल्याबद्दल भारती काळे यांचे पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे संस्थेतर्फे चंद्रकांत भुजबळ यांनी देखील अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love