#FTII : फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये लागले बाबरी मशीद समर्थनार्थ बॅनर : दोन गटात बाचाबाची

Banners in support of Babri Masjid put up at Film Institute
Banners in support of Babri Masjid put up at Film Institute

FTII |Babri Masjid – फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या(FTII) एका विद्यार्थी संघटनेने मंगळवारी रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्ट्यिुटेशन (बाबरीची आठवण, संविधानाची हत्या )( Remember Babri Death of Constitution) अशा आशयाचे बॅनर (Banner) लावले होते. त्यानंतर दोन गटात वादावादी होउन बॅनर हटविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. संबंधितांविरुद्ध कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल( Sandeep Singh Gill) यांनी दिली आहे. (Banners in support of Babri Masjid put up at Film Institute)

अयोध्येत(Ayodhya) श्रीप्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा( Prabhu Shri Ram Pran Pratishtha ) सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. त्यापार्श्वभूमीवर शहरात मोठ्या आनंदात नागरिकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, मंगळवारी  फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेने परिसरात रिमेंबर बाबरी  डेथ ऑफ कॉनस्ट्यिुटेशन अशा आशयाचे बॅनर लावल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दोन गटात वादविवादाची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.

अधिक वाचा  वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन

नर्‍हेत मांसविक्रेत्याकडून घोषणाबाजी करीत तरूणावर हल्ला

पुणे- नर्‍हे परिसरात मुस्लीम मांसविक्रेत्याने स्वताच्या धर्माची घोषणबाजी करीत दोघा तरूणांना कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परिसरातील काहीजणांनी संबंधित मांसविक्रेत्याला अडविले. त्यानंतर त्याने स्वतःला दुकानात कोंडून घेतले. त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने त्याला दुकानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.  घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेताना झटापटीत एका पोलीस कर्मचार्‍याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love