पुणे- 35 व्या पुणे फेस्टिव्हल ब्राइडल मेकअप स्पर्धेत, जया काची यांनी त्यांच्या अपवादात्मक मेकअप कौशल्यासाठी आणि आकर्षक सादरीकरणासाठी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच प्रभावी मेकअप व प्रतिभा प्रदर्शित केल्याबद्दल शर्वणी शिंदे ने दुसरे स्थान, मानसी शिरसागर ने तिसरे, स्मिता डाखोडे ने चौथे, शलाका कुलकर्णी ने पाचवे आणि पूनम खोपकर ने सहावे स्थान मिळवले. मोहक करणारी ब्रायडल मेकअप स्पर्धा बुधवार, २७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडली. या स्पर्धेची थीम मॉडेल्सवर पारंपारिक महाराष्ट्रीयन ब्रायडल लूक किंवा उत्कृष्ट दक्षिण भारतीय ब्रायडल लूक दाखवणे ही होती. अंजली जोशी, अतुल सिधये आणि हिरल काळे हे स्पर्धेचे परीक्षक होते. दीपाली पांढरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
लग्नाचा दिवस स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे, जो दोन कुटुंबांचे एकत्रीकरण, पत्नी म्हणून तिच्या जबाबदाऱ्या स्वीकारणे आणि सौंदर्य व व्यक्तिमत्वावर भर देण्याचे प्रतीक आहे. स्त्रियांना अंगभूत सौंदर्य असते, तर मेकअप आर्टिस्ट कुशलतेने त्यांचे नैसर्गिक तेज वाढवतात. पुणे फेस्टिव्हलने त्या मेकअप आर्टिस्टसाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. यावर्षी प्रथमच पुणे फेस्टिव्हल अंतर्गत वधू मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून प्रख्यात मेकअप आर्टिस्ट अभिषेक निंबाळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. ब्रायडल मेकअप स्पर्धेची सुरुवात दीप प्रज्वलनाने दीपाली पांढरे, अंजली जोशी, अतुल सिधये आणि हीरल काये यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रियाज डान्स अकॅडमीच्या प्रिया पाशंकर आणि तिच्या ग्रुपच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गणेश वंदनाने झाली. यावेळी आपली सखी आपली आवाज यांच्या संचालिका संगीता तरडे, हॉटेलीया ग्रुपचे अध्यक्ष चेतन बिडवे, नगरसेविका वर्षा साठे, मनीषा निंबाळकर, अॅड. अभय छाजेड, करूणा पाटील, सुप्रिया ताम्हाणे, अमृता जगधने, अंजली वागळे, संयोगिता कुदळे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत 100 हून अधिक मेकअप आर्टिस्टचा उत्साही सहभाग होता. त्यातून एकूण सहा बक्षिसे प्रदान करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात त्यांच्या सोबत आलेल्या मॉडेल्सवर मेकअप आर्टिस्टनी त्यांचे कौशल्य दाखवून परिश्रमपूर्वक मेकअप केले. कार्यक्रमात हिरकणी ग्रुप, प्री नृत्य अकॅडमी व फँटॅस्टिक फोर ग्रुपने बहारदार नृत्य सादर केले. चारूल देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
कमिटी प्रमुख अतुल गोंजारी, मोहन टिल्लू आणि श्रीकांत कांबळे यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेचे मुक्ताई किचन, ईईएस वेब स्पोन्सर्स आणि कोऱ्वो सायन्सेस मल्टी सर्विसेस प्रा. लि. हे प्रायोजक होते.
३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमाशिल्प आणि नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारतफोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.