अरुंधती फाऊंडेशनतर्फे सर्वपित्री अमावस्येला धर्मवीरांना सामूहिक तर्पण

अरुंधती फाऊंडेशनतर्फे सर्वपित्री अमावस्येला कर्मवीरांना सामूहिक तर्पण
अरुंधती फाऊंडेशनतर्फे सर्वपित्री अमावस्येला कर्मवीरांना सामूहिक तर्पण

पुणेः गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणांत वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाऊंडेशनने यंदाही सामूहिक तर्पण आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 10.00 ते 2.00 दरम्यान हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे पार पडणार आहे.

अरुंधती फाऊंडेशनचे आदित्य गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अरुंधती फाऊंडेशनचे हिमांशू गुप्ते उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर बहुचर्चित ‘His Story of इतिहास’ ह्या सत्यघटनेवर आधारीत भारतीय इतिहासातल्या अफरातफरीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे विनामूल्य प्रदर्शन होणार आहे.

गेल्या वर्षी श्री देव ओंकारेश्वर मंदिरात झालेला हा स्तुत्य उपक्रम सर्व हिंदू बांधवांच्या सहकार्याने यशस्वी झाला होता. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने धर्मप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हुतात्यांच्या बलिदानाचे स्मरण करावे, असे आवाहन आदित्य गुप्ते यांनी केले आहे.

अधिक वाचा  यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील - राष्ट्रपती कोविंद

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या या धर्मवीरांचे स्मरण करणे, त्यांना सामूहिक तर्पण अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाचा वारसा जपण्याची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी पार पाडणे हा आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्व हिंदू संघटना आणि नागरिकांनी या ऐतिहासिक कार्याला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love