ज्येष्ठ इतिहासकार तथा संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते अंभ्रूणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न

पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते अंभ्रूणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न
पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते अंभ्रूणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न

पुणे-  दरवर्षीप्रमाणे या वर्षीही धनलक्ष्मी प्रतिष्ठाण मंडई येथे शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशांच्या गजरात धनलक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना आणि अभिषेक ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

धनलक्ष्मी प्रतिष्ठान मंडई दरवर्षी नवरात्रोत्सवासह वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. तसेच गरजूंना विविध स्वरूपात मदत दिली जात असते. गेल्या २० वर्षांपासून ही परंपरा आजही अविरत सुरू आहे. यंदाचे हे २१वे वर्ष आहे. यंदा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचे श्रीलक्ष्मी सूक्त पठन, नवदुर्गा सन्मान तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जात आहेत.

धनलक्ष्मी माता प्रतिष्ठापना कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब अमराळे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, तुषार पठारे, आनंद  खन्ना, ऋषी सणस, सचिन चारोळी आशीष हिंगमिरे तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  मोदी सरकारच्या अन्यायकारक कृषी धोरणाविरोधात झोपडपट्टी सुरक्षा दलाचा एल्गार