Ajit Pawar plane crash :  अजित पवार यांच्या मृत्युचा तपास सीआयडीकडे

Ajit Pawar plane crash
Ajit Pawar plane crash

Ajit Pawar plane crash :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच बारामती विमानतळ परिसरात विमान कोसळून दुर्दैवी निधन झाले. या प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत संबंधित अपघाताची चौकशी सीआयडीमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अपघातस्थळी कोणालाही प्रवेश न देण्याच्या स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या घटनेप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. २८ जानेवारी रोजी मुंबई विमानतळावरून ‘लिअरजेट’ या आठ आसनी विमानाने अजित पवार हे बारामती येथे जिल्हा परिषद प्रचाराच्या सभांसाठी रवाना झाले होते. मात्र लँडिंगपूर्वीच विमान कोसळून झालेल्या अपघातात त्यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक वाचा  सुप्रिया सुळे यांनी अजित दादांचे औक्षण करून राखी बांधली

कमी दृश्यमानता आणि रनवेवर उतरताना पायलटचा अंदाज चुकल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. तसेच विमानातील तांत्रिक बिघाड किंवा घातपातामुळे हा अपघात झाला का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व शक्यता पडताळण्यासाठी सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. सीआयडीने अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (एडीआर) ताब्यात घेतला असून, प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणी करून तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) कडूनही या अपघाताचा स्वतंत्र तपास सुरू आहे.

तपासाची कागदपत्रे वर्ग

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास राज्य सरकारच्या आदेशानुसार सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे तपास प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पुणे ग्रामीण पोलीसांकडून या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love