सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुमारने बाजी मारली

सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुमारने बाजी मारली
सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुमारने बाजी मारली

पुणे(प्रतिनिधि)–उत्कृष्ट चाली आणि चाणक्ष्य बुद्धिच्या जोरावर नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने १२ वर्षाखालील सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतिने नुकतेच खडकी येथील रेंज हिल्स मध्ये सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने आपल्या उत्कृष्ट चालीनी सर्वांना चकित करत विजेतेपद पटकावले.
आयोजित स्पर्धेत २६४ स्पर्धकानी भाग घेतला त्यांतून ७७ स्पर्धक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पर्धक होते.अद्वैतला प्रशिक्षक गणेश अंताड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  Hyundai Motor India Limited ची प्राथमिक समभाग विक्री 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू