‘पोक्सा’च्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या नराधम शिक्षकाने पुन्हा केला 12 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार : शिक्षकासह मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना अटक

आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड

पुणे(प्रतिनिधि)–बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातून सुद्धा अशाच प्रकारची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिक्षकाने १२ वर्षाच्या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील शिक्षक लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात या अगोदर तुरूंगाची हवा खाऊन आला असून तो जामीनावर बाहेर आहे. पुन्हा त्याच शाळेत रूजू झाल्यानंतर पुन्हा तसाच घाणेरडा प्रकार त्याने केला असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी शिक्षक निवृत्ती काळभोर याला अटक केली आहे. तर या शिक्षकावरती अशा गंभीर  स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा शालेय सेवत रुजू केल्याप्रकरणी विद्यालयाचे मुख्याध्यापक, ट्रस्टचे अध्यक्ष यासह अन्य सदस्यांनाही अटक केली आहे. यात एका महिला सदस्याचाही समावेश आहे. या शिक्षकाला पुन्हा सेवेत कसे घेतले याची चौकशीही पोलीस करत आहे.

अधिक वाचा  'दगडूशेठ' गणपतीला मेरिडियन आइस्क्रीम तर्फे ५१ लिटरचे मोदक आईस्क्रीम : तब्बल ७०० गणेशभक्तांना वाटप

बदलापूर घटनेचे अद्यापही महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. बदलापूर च्या घटनेमुळं पीडित १२ वर्षीय मुलीने शिक्षकाने अत्याचार केल्याचं मोठ्या हिमतीने वर्ग शिक्षेकेला सांगितल्याने घटनेला वाचा फुटली. दोन वर्षे पीडित पी.टी. शिक्षकाच अश्लील कृत्य सहन करत होती. २०२२ ते २०२४ या कालावधीत त्याने हे कृत्य केले. शिवाय तो पीडित मुलीला जीवे मारण्याची वारंवार धमकी देत अत्याचार करत होता असा आरोप पीडित मुलीने केला आहे. ही बाब तिने आपल्या पालकांना सांगितली त्यानंतर त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

धक्कादायक बाब म्हणजे २०२८ साली सुद्धा या नराधाम शिक्षकाने अशाच प्रकारे लैंगिक छळ केले होते. ती माहितीही समोर आली आहे. त्यावेळी  त्याच्यावर  विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याला शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर ही शिक्षक जामीनावर बाहेर आला. जामीन मिळाल्यानंतर तो त्याच महाविद्यालयात पुन्हा रूजू झाला. त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्याने पुन्हा: एका मुलीचे लैंगिक शोषण केले.

अधिक वाचा  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजन वाढल्याने कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेतून बाहेर : असे ठेवतात खेळाडू आपलं वजन नियंत्रणात

२०१८ मध्ये देखील काळभोरन कीर्ती विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग केला होता. निगडी पोलिसात पॉस्कोचा गुन्हा दाखल होता. तरीही शाळेच्या संस्था चालकांनी जुजबी कारवाई करत पुन्हा त्याला रुजू केलं. याप्रकरणी कीर्ती विद्यालयाच्या संचालक कमिटीला देखील पोलिसांनी गुन्ह्यात अटक केली आहे. ली. सोफिया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव याच्यासह कमिटीतील महिला सदस्याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love