#A child idol of Sri Ramachandra was revealed : स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग- १४ :  श्रीरामचंद्राची बाल मूर्ती प्रकट झाली

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

A child idol of Sri Ramachandra was revealed : भारताचा स्वातंत्र्यलढा(Freedom Struggle of India) सुरू असतानाच पंडित मदनमोहन मालवीय(Pandit Madanmohan Malviya) यांच्या नेतृत्वाखाली सन १९३० च्या आसपास अखिल भारतीय रामायण महासभा( All India Ramayana Mahasabha )स्थापन झाली व या संघटनेने रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन(Ram Janmabhoomi Liberation Movement) सुरू केले. सन १९४४ मध्ये या संघटनेच्या वतीने अखंड रामचरित मानस पाठ(Ramcharit Manas Path) वाचनाचा कार्यक्रम घेऊन या विषयाला गती देण्याचा प्रयत्न केला गेला. सन १९४६ साली अयोध्येच्या (Ayodhya) परिसरातील साधू-संत यांच्यासमवेत सत्याग्रह देखील केला गेला. भारत स्वतंत्र झाल्यावर मात्र १९४९ पासून रामजन्मभूमी मुक्तीच्या लढ्याला आणखी जोर चढला व ही लढाई आता न्यायालयात देखील जाऊन पोहोचली.

आपला देश आता स्वतंत्र झाला आहे, आपलेच शासक आता आपल्याला न्याय देतील अशी हिंदू समाजाची भावना होती. त्यातच गुजरातमधील सोरटी सोमनाथ( Sorti Somnath) मंदिराचा जीर्णोद्धार भारत सरकार करेल असे १३ नोव्हेंबर १९४७ रोजी सरदार वल्लभभाई पटेल(Sardar Vallabhbhai Patel) यांनी जाहीर केले व पुढच्या काळात प्रत्यक्षात मंदिराच्या जिर्णोद्धाराला सुरवात झाल्यानंतर रामजन्मभूमी मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्यांना यामध्ये आशेचा किरण दिसला व सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराबरोबरच अयोध्येचाही प्रश्न शासनाकडून सोडवला जाईल अशी आशा वाटू लागली. परंतु प्रत्यक्षात उत्तर भारतातील तत्कालीन राजकीय पुढार्‍यांनी हिंदू समाजाच्या या मागणीकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले व हा प्रश्न तसाच कायम राहिला.

अधिक वाचा  'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार झोनल ऑफिसर ची भूमिका

शासनाकडून या प्रश्नाची सोडवणूक होत नाही हे लक्षात आल्यानंतर करपात्री महाराजांनी सन १९४८ मध्ये रामराज्य परिषद हा नवा पक्ष स्थापन करून या विषयासाठी संघर्षाला सुरवात केली. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांचे परात्पर गुरु व गोरखपीठाचे तत्कालीन प्रमुख महंत दिग्विजयनाथ हे त्याकाळी संयुक्त प्रांतातल्या हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यांनी देखील रामजन्मभूमी मुक्तीच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. याच काळात काँग्रेसच्या स्थानिक संघटनेत सक्रिय असणारे अखिल भारतीय रामायण महासभेचे आधारस्तंभ बाबा राघवदास यांनी देखील या संघर्षामध्ये सक्रिय सहभाग घेतला. अशा मान्यवरांनी सहभाग घेतल्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला. परंतु त्याच दरम्यान महात्मा गांधीजींची हत्या झाली व जवळ-जवळ वर्षभर हा संघर्ष थांबला. परंतु एक वेगळीच घटना त्या काळात घडली व त्या घटनेने पुन्हा एकदा या संघर्षाला सुरुवात झाली.

अधिक वाचा  नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच होणार पुण्याची लढत : दोन प्रमुख नेत्यांच्या झाल्या पुण्यात सभा

दरम्यान, वादग्रस्त ठरविल्या गेलेल्या वास्तूमध्ये २२-२३ डिसेंबर १९४९ च्या मध्यरात्री इमारतीच्या तीन घुमटांपैकी मधल्या घुमटाखाली गर्भागारात श्रीरामचंद्रांची बाल मूर्ती प्रकट झाली. या बाल मूर्तीची त्याच गर्भागारात प्रतिष्ठापना करण्यात आली व तिची पूजा – अर्चाही सुरू झाली. मुसलमानांनी यावर आक्षेप घेतला मात्र सरकारने मूर्ती काढून टाकली नाही, परंतु मुसलमानांच्या भावना लक्षात घेऊन त्या जागेला वादग्रस्त ठरवून कुलूप लावले व पोलीस पहारा बसवला गेला. १० जानेवारी १९५० रोजी ठाकूर गोपाल सिंह विशारद यांनी फैजाबाद न्यायालयात या विरुद्ध अर्ज केला व न्यायालयाने देखील प्रशासनाला कुलूप काढण्याचा व पहारा उठवण्याचा आदेश दिला, अलाहाबाद उच्च न्यायालयानेदेखील असाच आदेश दिला. परंतु तत्कालीन सरकारने हा आदेश न जुमानता सदर ठिकाण विवादास्पद म्हणून घोषित केले. मूर्तीची नियमित पूजा पुजारी करतील व बाकी हिंदू बाहेरून दर्शन घेऊ शकतील अशा प्रकारचा आदेश सरकारने काढून त्याप्रमाणे अंमलबजावणीला सुरवात केली.

अधिक वाचा  मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष - नाना जाधव

डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love