बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी केला सामूहिक बलात्कार : संशयित आरोपींच स्केच जारी

बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी केला सामूहिक बलात्कार
बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी केला सामूहिक बलात्कार

पुणे(प्रतिनिधि)- पुण्यातील बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळ घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, अत्याचार करणारे कोण होते याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही. पोलिसांना पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींच स्केच जारी केले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी मुळची सुरत येथील असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे. दोघेही एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आणि तिचा मित्र गुरुवारी रात्री अकरा वाजता सुमारास बोपदेव घाटामध्ये गेले होते. त्यावेळी तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. जबरदस्तीने या मुलीला कारमध्ये बसवून येवलेवाडीजवळ घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले.

अधिक वाचा  डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना उद्या न्यायालयात हजर करणार :एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

या घाटात रात्रीच्यावेळी कोणीच नसते, यामुळे कोणीही मदतीला नव्हते. या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडिट मुलीला तिच्या मित्राने एक खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस ठाण्याला साधारणपणे शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या संदर्भात रूग्णालयाकडून माहिती कळविण्यात आली. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या आणि पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला सूचना करण्यात आल्या असून त्यांची पथके देखील आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेली असल्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love