भारतातील लिंगभेद आणि डिजिटल विभाजन संपविण्यासाठी निता अंबानी आणि इव्हांका ट्रम्प आल्या एकत्र
मुंबई–भारतातील लिंगभेद आणि डिजिटल विभाजन याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी अमेरिकेच्या ‘यूनाइटेड स्टेट एजेंसी फॉर इंटरनॅशनल डेव्हलेपमेंट’ सोबत (USAID) हातमिळवणी केली आहे. या कार्यक्रमास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
2019 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘वुमेन्स ग्लोबल डेव्हलपमेंट प्रोस्पेरिटी’ (W-GDP) हा उपक्रम सुरु केला . इव्हांका ट्रम्प यांनी यांनी त्याचे संपूर्ण प्रारूप तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डब्ल्यू-जीडीपीने 2025 पर्यंत विकसनशील देशांमधील 5 दशलक्ष महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
रिलायन्स फाउंडेशन आणि यूएसएआयडी डब्ल्यू-जीडीपी यांनी यासाठी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. डब्ल्यू-जीडीपी अंतर्गत एका विशेष कार्यक्रमात ही महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली गेली. अमेरिकेचे उपमंत्री स्टीफन बेझगुन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात यूएसएआयडीचे उप-प्रशासक बोनी ग्लिक देखील होते.
या कार्यक्रमास वर्चुअली संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या: “रिलायन्स फाऊंडेशन आणि डब्ल्यू-जीडीपी यूएसएआयडीच्या भागीदारीत एकत्र येत असल्याचे जाहीर करताना मला आनंद आणि अभिमान वाटतो. 2020 मध्ये आम्ही एकाच वेळी डब्ल्यू-जीडीपी वूमनकनेक्ट चॅलेंज भारत भरात सुरू करू. भारतातील लिंगभेद आणि डिजिटल विभाजन या दोन्ही गोष्टींचे उच्चाटन करणे, हे आमचे समान लक्ष्य आहे कारण जेव्हा स्त्रिया जागृत होतात तेव्हा कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग शोधतात. जिथे सर्वाना समानता प्रदान केली जाते अशा राष्ट्रालाच खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र म्हटले जाते”
रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने डब्ल्यू-जीडीपी संपूर्ण भारतभर वूमन कनेक्ट चॅलेंजची सुरूवात करणार आहे. हे आव्हान भारतातील लैंगिक भेदभाव दूर करेल तसेच भारतीय महिलांना व्यवसायात उतरण्यासाठी प्रोत्साहन देईल.
राष्ट्रपतींचे सल्लागार इव्हांका ट्रम्प म्हणाल्या, “नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डब्ल्यू-जीडीपी फंड तयार केला गेला. चिरस्थायी आणि गहन परिणाम होण्यासाठी आम्ही अमेरिकन सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संसाधने आणि तज्ञाचा फायदा घेत आहोत.
रिलायन्स फाउंडेशनलाही महिला सबलीकरणाच्या मोहिमेमध्ये रिलायन्स जिओच्या सामर्थ्याचा देखील वापर केला जाणार आहे. रिलायन्स जिओचे सुमारे 400 दशलक्ष ग्राहक आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत दुसरीकडे रिलायन्स फाऊंडेशनही आपला दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. गेल्या दशकात रिलायन्स फाऊंडेशने 30 दशलक्षांहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स फाउंडेशन भारतातील डिजिटल लिंग विभाजन संपविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.