नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे-जे. पी. नड्डा


पुणे(प्रतिनिधि)-नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरु केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. ही कामे सामान्य माणसापर्यंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष (National President of Bharatiya Janata Party) जे. पी. नड्डा (j. p. Nadda)यांनी गुरुवारी पुणे येथे केले.

भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोपप्रसंगी नड्डा बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadanvis) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bavankule) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,(Vinod Tawade) तरुण चुघ, (Tarun Chugh) राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, (Vijaya Rahatkar सुनील देवधर, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

जागतिक मंदीचे रूपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधीत करीत भारतीय अर्थव्यवस्थेला पाचव्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. भारतातील महागाईही इतर देशांच्या तुलनेत कमी असून, गरिबीही घटत असल्याचा दावा जे. पी. नड्डा यांनी केला.

अधिक वाचा  राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र

नड्डा यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, आज लोकसभेत पक्षाचे ३०३ तर राज्यसमेत ९३ खासदार आहेत. आमदारांची संख्याही जवळपास १३०० च्या वर आहे. लोकांच्या पाठिंब्याच्याच बळावर आपण येथवर येऊन पोहोचलो आहोत. मात्र, आपल्याला थांबून चालणार नाही. आगामी काळातही रिझल्ट आपल्या बाजूने येतीलच परंतु बूथ स्तरावर आपल्याला आणखी भरीव काम करायचे आहे. तसेच बूथ संख्या १० लाख ४० हजारवर न्यायची आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरू केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. मोदी यांनी संकटाचे संधीत रुपांतर केले. जागतिक मंदीतही भारत तगून असून, अमेरिका, यूरोप, रशियासह इतर देशांतील महागाईच्या तुलनेत आपल्याकडची महागाई कमीच आहे. काँग्रेसने गरिबी हटाव या घोषणेच्या आधारावर ३० वर्षे राजकारण करीत पोळी भाजून घेतली. मात्र, प्रत्यक्षात गरिबी हटली नाही. मात्र, भाजपाच्या सत्ताकाळात अतिगरिबीच्या पातळीवरचा आपला टक्काही घसरल्याचे दिसून येत आहे. देशातील गरिबी एक टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मागच्या ७० वर्षांत केवळ ७४ विमानतळ उभारण्यात आले. तर मोदीकाळातील केवळ ९ वर्षात तब्बल ७४ एअरपोर्ट सुरू करण्यात आले. हा खरा विकास आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)

आगामी निवडणुकीत भाजपा निवडून येईलच. किंबहुना, कार्यकर्त्यांनी पोलिटिकल अजेंडा सेट करावा. तसेच बाहेरच्या प्रभावात राहू नये, असा संदेशही त्यांनी दिला.

काँग्रेसच्या काळात सीमावर्ती भागातील रस्त्यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. मोदी सरकारने सीमावर्ती भागात चौपदरी रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. देशभर द्रुतगती महामार्ग, चौपदरी रस्ते, महामार्ग यांची कामे मोठ्या वेगाने सुरु आहेत. गेल्या ८ वर्षांत विमानतळांची संख्याही वाढली आहे. वंदे भारत सारखी नवभारताचा चेहरा असणारी रेल्वे सुरु झाली आहे, असेही नड्डा यांनी सांगितले.

नड्डा म्हणाले की, भाजपा हा केवळ सत्तेचे राजकारण करणारा पक्ष नाही. कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यांनी कोट्यवधी जनतेची सेवाभावाने मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ७ सूत्रांचे आचरण करण्यास सांगितले आहे. सामान्य माणसाच्या भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद ठेवत सेवाभाव वृत्ती जोपासली पाहिजे.

अधिक वाचा  #Kirit Somaiya: शरद पवार कुटुंबाने सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड काळात ४३५ कोटी रुपयांची केली वसुली - किरीट सोमय्या

राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी संघटनात्मक बाबींविषयी कार्यसमिती बैठकीत मार्गदर्शन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love