टीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार


पुणे-: बी२बी कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड कम्युनिकेशन सुविधा प्रदान करणारी देशातील एक आघाडीची कंपनी टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करत आहे. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना आपल्या व्यवसायातील कामे क्लाऊड ऑन पे ऍज यु गो मॉडेल च्या सुरळीत संचालनासहित आधुनिक बनवता येईल आणि वेगाने पुढे जात असताना देखील आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव प्रदान करता येईल.,

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुविधा अधिक वेगाने आणि सुरक्षित पद्धतीने इन्स्टॉल करण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि अपग्रेड करण्यासाठी तसेच गती व नावीन्यपूर्णता यांच्यासह सर्व क्षेत्रांमध्ये सेवांच्या विस्ताराची सुविधा उपलब्ध होत आहे.  यामध्ये त्यांचा प्राईस-परफॉर्मन्स देखील खूप चांगला होऊ शकतो. व्यवसायामध्ये अधिक चांगले आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी ते एआय आणि प्रगत ऍनालिटिक्स यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. लघु आणि मध्यम उद्योग पायाभूत सेवा आणि आयटी व्यवस्थापनाच्या खर्चात बचत करू शकतील कारण त्यांना टीटीबीएसकडून २४*७ सिंगल विंडो सहायता आणि व्यवस्थापित सेवा मिळतील.

अधिक वाचा  'घरात येऊ लस देऊ' महाराष्ट्रातील पहिला उपक्रम पुण्यात

टाटा टेली सर्व्हिसेस लिमिटेडचे सिनियर व्हीपी आणि प्रमुख – उत्पादन, मार्केटिंग आणि वाणिज्यिक विशाल रॅली म्हणाले, व्यवसायांचे डिजिटल परिवर्तन वेगाने व सहजसोप्या पद्धतीने व्हावे यासाठी टीटीबीएसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. देशभरात आमचे विशाल नेटवर्क, अद्वितीय क्लाऊड व्यवस्थापित सेवा, सुविधांचा विशाल पोर्टफोलिओ यांच्यासह आम्ही मायक्रोसॉफ्ट अज्योर लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुसज्ज आहोत.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर – कॉर्पोरेट, लघु व मध्यम उद्योग समीक रॉय यांनी सांगितले की, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस सारख्या कंपन्या एसएमबीच्या गरजा समजून घेऊ शकतात आणि त्यांना मायक्रोसॉफ्ट अज्योरसोबत नावीन्यपूर्णता, विकास व भविष्यासाठी तयार होण्यात सशक्त बनवू शकतात.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love