अ. भा. मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या विविध पुरस्कारांची घोषणा


तळेगाव दाभाडे-  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये तळेगावच्या सांस्कृतिक चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांना जीवन गौरव पुरस्कार, नृत्य अभ्यासक व सृजन नृत्यालयाच्या संचालिका डॉ. मीनल कुलकर्णी व तळेगावच्या प्रसिद्ध निवेदिका व पत्रकार डॉ. विनया केसकर, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे नाट्य निर्मिती प्रमुख नाट्य सिनेनिर्माते संतोष साखरे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. तर रात्रीस खेळ चाले फेम प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.

अधिक वाचा  पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार?जिल्हधिकारी पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु

 पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी (दि.21) सायंकाळी 6.30 वाजता सेवधाम ग्रंथालय, नाना भालेकर कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते संपन्न  होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित राहणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love