चंद्रकांतदादा पाटील यांचा एक कोटीचा आमदार विकास निधी बाणेर येथील कोविड रुग्णालयासाठी


पुणे-भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये हे कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथील रुग्णालयासाठी विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी खर्च करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निधीसह उर्वरित 3  कोटीचा विकास निधी देखील आवश्यकतेनुसार कोविड संसर्गावरील विविध उपाययोजनासाठी खर्च करणार असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

नेहमीच्या विकासकामांना फाटा देऊन यावेळेसचा निधी हा पूर्णपणे आरोग्यावर खर्च करणार असल्याचेही चंद्रकांतदादा म्हणाले.चंद्रकांतदादा यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने सर्व आमदारांना कोवीड साठी दिलेल्या निधीतून बाणेर येथील रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर, 10 मॉनिटर व अनुषंगिक साहित्य,2 एक्स रे मशीन प्रिंटर व व्युहर सह ( रेडिओग्राफी तंत्रज्ञान ) इ.सी जी मशीन, पी ए व सिसिटीव्ही व अन्य रुग्णोपयोगी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  शरद पवार यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळालं नाही हे गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील

 जिल्हाधिकारी यांनी खरेदी प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी अशी अपेक्षा ही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love