94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार


 पुणे– अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

ठाले-पाटील म्हणाले, साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नुकतीच या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला दिला होता. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर आज स्थळ निश्चितीची घोषणा करण्यात आली. संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे (दिल्लीसाठी) एक आणि अंमळेनेरचे एक अशी निमंत्रणे आली होती. साहित्य महामंडळाने स्थळ निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारून 94 व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली. मार्च महिन्याच्या अखेरीस हे संमेलन होणार आहे.

अधिक वाचा  पुणेकरांसाठी खुशखबर: आता मिळवा ५०० रुपयात एमएनजीएलचे गॅॅस कनेक्शन

दिल्लीसाठी होता ’विशेष’ संमेलनाचा प्रस्ताव, पण…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद्द संस्थेचे निमंत्रक संजय नहार यांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी एक ’विशेष’ साहित्य संमेलन घेण्याचा विचार महामंडळ करील, असं नहार यांना सुचवण्यात आलं होतं. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही तसा प्रस्ताव दिला होता. मात्र, संजय नहार यांनी महामंडळाचा हा प्रस्ताव नाकारला, अशी माहिती ठाले-पाटील यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love