नवी दिल्ली – भारताने अमेरिकेला शस्त्रास्त्र विक्रीच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सेवा प्रदान कारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने त्यांच्या नौदलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रशिक्षकांचा शोध सुरू केला आहे. त्यानंतर भारताने अमेरिकेला प्रस्ताव सादर केला आहे.
भारताने अमेरिकन नौदलाच्या अंडरग्रॅज्युएट जेट ट्रेनिंग सिस्टमसाठी प्रतिसाद दिला आहे. भारतीय लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या लीड इन फाइटर ट्रेनर (LIFT) आवृत्तीसह भारताने अमेरिकेच्या अधिकृत विनंतीला (आरएफआय) उत्तर देताना हा प्रस्ताव दिला आहे.
Newscorps Wire Services