मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आक्रमक बॅनरबाजी; ‘कुणबी नोंद नसलेल्यांचे काय?’ असा सवाल

मराठा आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे बॅनरबाजी
मराठा आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे बॅनरबाजी

पुणे(प्रतिनिधी)- पुण्यात सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या मार्गावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक बॅनरबाजी केली. मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने या बॅनरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाबाबत जाब विचारण्यात आला. “कुणबी नोंद नसलेल्या मराठ्यांच्या आरक्षणाचं काय?” आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर द्यावे,” अशी मागणी या फलकांच्या माध्यमातून करण्यात आली. दुपारी पोलिसांकडून हटविण्यात आले.

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. त्याच्याच दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या नियोजित मार्गावर थेट मराठा आरक्षणाबाबतचे फलक लावून मराठा क्रांती मोर्चाने तीव्र निषेध व मागण्या नोंदवल्या.  या बॅनर्सच्या माध्यमातून, “कुणबी नोंद नसलेल्या मराठ्यांच्या आरक्षणाचं काय?” असा प्रश्न विचारण्यात आला होता  तसेच “एसईबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर द्यावे,” अशी मागणी या फलकांच्या माध्यमातून करण्यात आली.

अधिक वाचा  'लाडकी बहीण' योजनेत 'इलेक्टोरल भ्रष्टाचार'; आरटीई, शिक्षण अभियानाचा निधी वळवला: सुप्रिया सुळेंचा खळबळजनक आरोप

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love