पुणे(प्रतिनिधी)- पुण्यातील Network Science ने NSOffice.AI हा एंटरप्राइझ उत्पादकता वाढवण्यासाठी विकसित केलेला एकत्रित AI प्लॅटफॉर्म हा बाजारात सादर केला आहे. विविध व्यावसायिक प्रणाली एकाच नियंत्रित इंटरफेसखाली आणून कामकाजातील विखुरलेपणा कमी करण्याचे उद्दिष्ट या प्लॅटफॉर्मचे आहे. हा प्लॅटफॉर्म संपूर्ण भारतीय बनावटीचा असून उद्योगांमध्ये AI तंत्रज्ञानाच्या वापरा साठी एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
NSOffice.AI हे कंपनीच्या “थिंक–नो (know) –डू (do)” आर्किटेक्चरवर आधारित आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कर्मचारी माहिती शोधणे, विश्लेषण करणे आणि दैनंदिन कामे स्वयंचलित पद्धतीने पूर्ण करण्याच्या टप्प्यांना एकाच ठिकाणी प्रवेश मिळतो. हा प्लॅटफॉर्म 150 पेक्षा जास्त व्यवसाय-अॅप्लिकेशन्सशी थेट जोडला जाऊ शकतो. प्लॅटफॉर्ममध्ये GPT-5.1, Gemini 3, Claude यांसारख्या प्रगत AI मॉडेल्सचे मल्टी-मॉडेल ऑर्केस्ट्रेशन उपलब्ध असून, निर्णयक्षमता व अचूकता वाढवण्यात याचा वापर होणार आहे.
Network Science चे CEO संदीप हर्डीकर यांनी सांगितले की, “एंटरप्राइझमध्ये अॅप्लिकेशन्सची संख्या वाढण्यापेक्षा त्यांचे एकत्रीकरण अधिक महत्त्वाचे बनत आहे. NSOffice.AI कर्मचारी विचार, ज्ञान-अभिगम व कार्य-अंमलबजावणी यांना संस्थात्मक संदर्भासह एकाच ठिकाणी जोडतो.”
कंपनीच्या मते, अनेक संस्थांमध्ये कर्मचारी दिवसात सुमारे 38% वेळ माहिती शोधण्यात घालवतात, तर उपलब्ध ज्ञानापैकी मोठा भाग माहितीच्या विविध गटांमध्ये मध्ये विभागलेला राहतो. NSOffice.AI हे गट कमी करून एकत्रित ज्ञानप्राप्ती आणि वर्कफ्लो अंमलबजावणीची सोय उपलब्ध करून देतो.
तीन प्रमुख मॉड्यूल्स
Think: परिस्थिती विश्लेषण, अंदाज आणि निर्णयाधारित शिफारसी
Know: 150+ माहिती स्त्रोतांमधील एकत्रित शोध
Do: दस्तऐवज व प्रेझेंटेशन तयार करणे आणि मल्टी-सिस्टम कामे स्वयंचलित करणे
प्रारंभीच्या ग्राहकांनी 35% ते 50% वेगवान माहिती-अभिगम, कंटेंट निर्मितीत दुप्पट ते चौपट वाढ, आणि पुनरावृत्तीच्या कामांमध्ये 30% ते 40% घट नोंदवली आहे. प्लॅटफॉर्ममुळे AI वापराचे संस्थात्मक गव्हर्नन्सही सुधारले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Network Science बद्दल
Network Science ही एंटरप्राइझ जगासाठी AI-आधारित ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करणारी कंपनी असून, आतापर्यंत 150 हून अधिक AI प्रकल्पांची अंमलबजावणी तिने केली आहे. कंपनीचे लक्ष धोरण, डेटा, प्रणाली आणि मानव संसाधनांना एकत्रित करणाऱ्या AI आर्किटेक्चरवर आहे.
अधिक माहिती: [www.NSOffice.ai](http://www.NSOffice.ai)













