पाथरवट-आगरी समाज्याच्या संयुक्त भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक मेळाव्याचे पंचवटी- नासिक येथे आयोजन

पाथरवट-आगरी समाज्याच्या संयुक्त भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक मेळाव्याचे पंचवटी- नासिक येथे आयोजन
पाथरवट-आगरी समाज्याच्या संयुक्त भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक मेळाव्याचे पंचवटी- नासिक येथे आयोजन

नाशिक- अखिल पाथरवट व तत्सम समाज सेवा संस्थांच्या (महाराष्ट्र) नासिक यांच्या वतीने पाथरवट -आगरी समाज्याच्या संयुक्त भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक मेळाव्याचे आयोजन कन्यादान लॉन्स दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक येथे रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पाथरवट समाज हा शिल्पकार म्हणून परिचित असताना राज्यात विविध भागांमध्ये तो विखुरलेला आहे. विखुरलेला समाज एक संघ करण्यासाठी पाथरवट समाजाच्या समाज बांधवांनी एकत्र येत   या वधु-वर-पालक मेळाव्याचे आयोजन केले आहे. पाथरवट समाज नाशिक जिल्हा, अहिल्यादेवी नगर, छत्रपती संभाजी नगर, नंदुरबार, बडोदा, शहादा,तसेच आगरी समाज कल्याण, ठाणे,मुंबई भागात विखुरलेला असून सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि समाजातील सुशिक्षित तरुण तरुणी यांना त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने योग्य पसंतीचा जोडीदार निवडता यावा यादृष्टीने या वधु-वर-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  आद्यकवी महर्षी वाल्मिकी

राज्यात विविध जिल्ह्यामध्ये पाथरवट समाज विखुरलेला आहे. समाजातील सुशिक्षित तरुण तरुणी यांना त्यांच्या शिक्षणाच्या पसंतीचा जोडीदार निवडण्यासाठी अखिल पाथरवट व तत्सम समाज सेवा संस्थांच्या (महाराष्ट्र) नासिक यांच्या वतीने हे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे. विखुरलेल्या समाजात शिकलेली मुलं-मुली आहेत. परंतु, एकमेकाचा परिचय नसल्याने समाजातील नातेवाईक व आपल्याला  समाज बांधवांचा परिचय नसतो. वधु-वरांच्या स्थळासाठी पालकांना परीचयाअभावी बाहेरगावी प्रत्येक ठिकाणी जाणे येणे शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील विवाहयोग्य मुला मुलींना स्थळ पाहण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. त्या अनुषंगाने या भव्य राज्यस्तरीय वधु-वर- पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे अखिल पाथरवट व तत्सम समाज सेवा संस्था (महाराष्ट्र) नाशिकचे सचिव हेमंत भोईर यांनी सांगितले.

अधिक वाचा  डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना उद्या न्यायालयात हजर करणार :एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

अखिल पाथरवट व तत्सम समाज सेवा संस्था (महाराष्ट्र) नाशिक येथील अध्यक्ष लक्ष्मणराव कुडके, उपाध्यक्ष -देवराम शेठ मराडे, सचिव- हेमंत भोईर, कोषाध्यक्ष प्रशांत टोरपे, अॅड. जी. पी. चव्हाण, अभियंता राजाराम डोंगरे साहेब, महेंद्र आमले, प्रभाकर भोईर, दत्तात्रय गवळी,अभय आमले, प्रताप माळी, भरत कुडके,अलका गोपाळे, सुवर्ण मराठे, विजयाताई मस्के, बिंदिया डोंगरे, शशिकांत मुठाळ असुन त्यांनी ह्या कार्यक्रम सहभागी होण्यासाठी नितीन लाटे (नाशिक)किशोर फुनगे (श्रीरामपूर)दिनेश भोईर (पुणतांबा). कैलास गोपाळे (पांगरी), संतोष भोपी (सिन्नर) मच्छिंद्र भगत (घोटी ),युवराज शेरे कोपरगाव, भाऊलाल कुडके नगरसुल , विवेक भोईर मालेगाव, जयेश मराठे नंदुरबार, नारायण मलेटे,अजय मराठे बडोदा, सुनील धुमाळ (शहादा)अमोल डुकरे,संगमनेर आदींनी पुढाकार घेऊन समाज बांधव एकत्र करून वधु-वर-पालक मेळाव्याचे नियोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये पाथरवट बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन लाभ घ्यावा तसेच सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी वधु-वर सूचक फॉर्ममध्ये माहिती भरून तो अर्ज स्थानिक स्तरावर निवडलेल्या व्यक्तींकडे द्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love