रक्तदान मानवता धर्म शिकवतो : गोपाळदादा तिवारी

रक्तदान मानवता धर्म शिकवतो
रक्तदान मानवता धर्म शिकवतो

पुणे- पुणे शहरात ‘रक्ताचा तुटवडा’ असल्याने रक्तदान शिबीर वरदान ठरते आहे मात्र रक्तास जात, पात, धर्म नसल्याने रक्तदानाचे संस्कार मानवता धर्म शिकवत असल्याचे उदगार काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे नेते, संस्थापक अध्यक्ष स्व. संगण्णाजी धोत्रे व स्व. संजयजी धोत्रे यांचे स्मरणार्थ मॉडेल कॉलनी छ. शिवाजी महाराज नगर येथील ‘एस. एस. धोत्रे फाऊंडेशन’ वतीने आयोजित ‘रक्तदान शिबिराचे’ उद्घाटन काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे हस्ते झाल्या प्रसंगी ते बोलत होते. सामाजिक व मानवी गरजेची हाक लक्षांत घेऊन तत्परतेने रक्तदान करणाऱ्या तरुण – तरुणींना धन्यवाद देत अभिनंदन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका- राज्यपाल कोश्यारी

शिबिराचे संयोजक – निमंत्रक  श्री. विक्रांत धोत्रे (उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर युवक काँग्रेस) व धोत्रे कुटुंबीयांनी ऊपस्थितांचे स्वागत केले. वडार समाजाचे नेते स्व शिव्वाण्णा धोत्रे यांचे पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, इंटक कामगार संघटनेचे कायदे सल्लगार ॲड. फैयाज शेख, राकेश विटकर, शहर काँग्रेस सरचिटणीस संजय मोरे, भाजप युवा मोर्चाचे हेमंत डाबी, सौ पौर्णिमा भगत, अदिती निकम, अण्णा भंडगर, सुरेश सपकाळ, अपर्णा कुऱ्हाडे, प्रा. रोहित आळंदीकर, नरेश आवटे, सौ वैशाली धोत्रे इ उपस्थित होते.

माजी आमदार रविंद्र धंगेकर, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली असता त्यांचे हस्ते “रक्तदात्यांस सर्टिफिकेट व स्व एस एस धोत्रे यांचे स्मरणार्थ भेट वस्तु” देऊन सन्मानित करण्यात आले..! मा धंगेकर यांनी संयोजकांचे सामाजिक उपक्रमा बद्दल कौतुक केले.

अधिक वाचा  राज्यपाल कोश्यारींनी स्वत:ला केले आयसोलेट, राजभवनातील १६ कर्मचार्यांना कोरोनाची लागण

सुत्र संचालन – ॲड फैयाज शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक श्री विक्रांत धोत्रे यांनी केले. रक्तदान शिबिराचे संकलन “अक्षय ब्लड बँकेने” केले. सदर शिबिरात ७५ रक्त बाटल्यांचे संकलन झाले. डॅा राजकुमार  आणि त्यांचे सहकारी पल्लवी महांडवे, प्रीती पवार, प्रणाली होले, प्रणय घाडगे, नवनाथ कानडे इ मेडीकल टिम चे सहकार्य लाभले.

रक्तदान शिबिराचे यशस्वी करण्यात राहुल शिंदे, साहिल शिंदे, इंद्रनील मराठे, जैष्णवी धोत्रे, सचिन धोत्रे, नरेश आवटे, यशवंत इरकल, रुपाली ठाकरे, प्रशांत शेट्टी, विकास सोनावणे, अनुष्का बुरगुटे, विद्या जाधव, सिकंदर शेख,आकाश सुरवसे,इ चे सहकार्य लाभले.

तसेच ट्रस्टचे कार्यकर्ते इंद्रनील मराठे, रुपाली ठाकरे, राहुल शिंदे, शुभम साबळे, रोहित शर्मा,  आकाश सुरवसे, सोमनाथ निळ, प्रमोल पाटील, शुभम सावळे, विकास सोनवणे, अनुष्का बुरगुटे,आदित्य जरड, श्रावस्ती कांबळे, विद्या जाधव, अजिंक्य जोगदंड, यशोधन मोरे, विशाल भोर, प्रद्ध्युम स्वामी, प्रज्वल सुवर्ण, गणेश पवार व  मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love