पुणे- राष्ट्र सेविका समिती, येरवडा भाग यांचा श्री विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव आणि पथ संचलनाचे आयोजन रविवारी ०६ ऑक्टोंबर रोजी वाघोली येथील मनपा शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते.
समिती अधिकाऱ्यांकडून शस्त्रपूजन करून सघोष शिस्तबध्द संचलन वाघोली गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले. या संचलनात एकूण २८० सेविका पूर्ण गणेवशात होत्या.
वाघोलीकरांनी संचलन मार्गावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. नवरात्रीच्या दिवसात मोठ्या संख्येत मात्तृशक्तीचे शिस्तबध्द सघोष संचलन पाहून वाघोलीकराणा वेगळाच आनंदाचा अनुभव आला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. पूजाताई कंद (अध्यक्ष,सोमेश्वर पतसंस्था) आणि समितीच्या अधिकारी मा. मंजिरीताई कोल्हटकर (प्रांत कार्यकारिणी सदस्य) आणि मा. शीतलताई फाटक (प्रांत प्रचार प्रमुख) उपस्थित होत्या. येरवडा भाग कार्यवाहिका वर्षाताई मानेकर यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला नागरिकांसह एकूण उपस्थिती ३४५ होती.