24 तास उलटूनही पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरूच : अलका चौकात पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची तर टिळक रस्त्यावर ठिय्या आंदोलन

24 तास उलटूनही पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरूच
24 तास उलटूनही पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरूच

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक 24 तास उलटूनही मिरवणूक सुरू आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी अलका टॉकीज चौकात गणेश मंडळाचे कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांकडून बळाचा वापर झाला. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तर पुण्यातील इतर मार्गाने जाणाऱ्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीम सुरु करण्यात आल्या परंतु टिळक रोडवरील सिस्टीम सुरू करू न दिल्याने संतप्त झालेल्या मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आणि विघ्नहर्ता न्यासच्या मंडपासमोरच ठिय्या आंदोलन केले.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 24 तास झाले आहेत. त्यानंतरही अजून ही मिरवणूक सुरुच आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 116 गणेश मंडळाचे विसर्जन झाले आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार घालून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड या मार्गावरून अजूनही मिरवणूक सुरू आहे. मिरवणूक शांततेत सुरु आहे. परंतु अलका चौक आणि टिळक रस्त्यावर पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांची बिनविरोध निवड

अलका चौकात तणाव

अलका चौकात एक सार्वजनिक गणेश मंडळ एका जागी थांबून डीजे वाजवत होते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली. त्या मंडळास पोलिसांनी वारंवार सांगून देखील कार्यकर्ते मंडळाची मूर्ती पुढे नेत नव्हते. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येत वाद थांबावत त्या गणेश मंडळाला पुढे सरकवले.

टिळक रोडवरील मंडळाचे ठिय्या आंदोलन : बाप्पाची मूर्ती घेतली रस्त्यावर

पहाटे सहा पर्यंत स्पीकरला परवानगी नसल्यामुळे सर्वच रस्त्यावरील मंडळांनी स्पीकर बंद केले होते .सकाळी सहा वाजता सर्व मार्गावरील स्पीकर  सुरू झाले पण टिळक रोडवरील मार्गावरील मंडळांना स्पीकर सुरू करून देण्यात आले नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते चिडले. त्यांनी खूप विनंती करून सुद्धा स्पीकर बंद ठेवण्यात आले. फक्त टिळक रोडला दूजाभाव का असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले. पण त्यांना स्पीकर सुरू करून दिले नाहीत.  त्यामुळे सर्व मंडळे आंदोलन करण्यासाठी एस.  पी.  कॉलेज चौकात जमली आणि त्यांनी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास मांडवात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा  रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी - चंद्रकांतदादा पाटील : रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्ट सुरू

बाप्पाची मूर्ती काही मंडळांनी रस्त्यावर ठेवण्याची तयारी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे  समन्वयक प्रवीण चोरबेले , सालेम खान यांनी मंडळांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही मंडळांनी गणपतीची मूर्ती रस्त्यावर ठेवण्याची तयारी सुरू केली.  श्री प्रवीण पाटील व पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली. त्यांनी गणेश मंडळांची संवाद करून समजूत काढून  त्यांना शांत केले.  यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले व गणपतीची आरती लावून जल्लोषात मिरवणूक पुन्हा सुरू झाली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love