मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान

मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान
मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान

पुणे(प्रतिनिधि)— शासनाची चूक काय होती, तो नंतरचा विषय आहे. पण शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? याचं एका वाक्यात उत्तर द्या. मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही सांगा,असे आव्हान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकच मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. मात्र, विरोधक आणि  सत्ताधारी या सर्वांनी मिळून मनोज जरांगे यांना समजावलं पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारने दोन्ही समाजाच्या नेत्यांशी परस्पर चर्चा केली. मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद वाढत गेला. दोन्ही समाजाच्या नेत्यांसोबत एकत्र चर्चा केली असती तर वाद वाढला नसता. सरकारची हीच मोठी चूक होती, अशा शब्दात शरद पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. शरद पवार यांच्या या टीकेचा भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पवारांनी मुख्यमंत्री असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का दिलं नाही? याचं एका वाक्यात उत्तर द्या, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

अधिक वाचा  फडणवीसांनी ‘बकवास व दीशाभूल करणारी मुक्ताफळें’ ऊधळू नयेत- गोपाळदादा तिवारी

जेव्हा बैठक बोलावली तेव्हा शरद पवार आले नाहीत आणि आता या विषयावर बोलत आहेत. बैठक घेतल्यावर मनोज जरांगे यांनी आता स्वत: उपस्थित राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री बैठक बोलावतीलच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सगेसोयरे वादातून शासन मागे गेलेले नाही. सरसकट आरक्षण देण्याची आता मागणी आहे. मातृ आणि पितृ अशी मागणी आहे. ओबीसी समाजाचा म्हणणं आहे की, कुणबी आहे त्यांना कशाला? या दोन्ही मागण्या होताना दिसत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

हे मोदींचं मोठेपण

शरद पवार साहेब काय म्हणतील काही माहिती नाही. पण जेव्हा गरज होती तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला मदत केली, असं मोदी जाहीरपणे सांगत असतात. हे मोदींचं मोठेपण आहे. शरद पवार यांचं मोठेपण ते मान्यच करत आहेत. त्यामुळे त्यावर पडदा टाकण्याचं काम थोडीच होणार आहे, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  'वक्फ'चा भूखंड बळकावण्याच्या धंगेकरांच्या प्रयत्नाला चपराक

राज ठाकरे यांच्याशी बोलणं करण्याचं काम त्रिमूर्तींचं

महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्याशी बोलणं करण्याचं काम आमची त्रिमूर्ती करत आहे. ते सांगतील ते आम्ही मानू. जागा वाटप, बोलणं या सर्व गोष्टी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love