पुणे(प्रतिनिधि)–राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्भूमीवर श्रीनाथ भिमाले यांच्यावतीने पर्वती विधानसभा मतदारसंघातील ३० ठिकाणी मतदार नोंदणी आभियान व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियान सुरू करण्यात येत आहे.
दिनांक ८ ते १४ जुलै या दरम्यान होणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ सोमवार दि ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता गजानन महाराज मंदिर,लक्ष्मीनगर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. या अभियानाचा शुभारंभ माजी खासदार प्रदिपदादा रावत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलतांना श्रीनाथ भिमाले म्हणाले की ,”मतदार हा कुठल्याही लोकशाही व्यवस्थेचा कणा असतो. भारतीय लोकशाहीमध्ये देखील जास्तीत जास्त लोकांनी मतदार नोंदणी केली पाहिजे. आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यापासून तर विधिमंडळामध्ये बसून कायदे करण्यापर्यंतची सर्व ताकद या भारतीय लोकशाहीमध्ये आहे. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान नोंदणी करून माहिती लोकशाहीचा पाया भक्कम करावा तसेच काही नागरिकांच्या मतदान नोंदणी मध्ये दुरुस्ती देखील करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक नागरिकांना मतदान केंद्र शोधणे मध्ये विलंब लागला. मतदारांची ही गैरसोय होऊ नये यासाठी मतदार नोंदणीत दुरुस्ती करणे देखील आवश्यक आहे. राज्यात महायुती सरकारकडून महिला भगिनींसाठी लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी या ३० केंद्रांवर करण्यात येणार आहे. तरी माझे पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की, जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवत मतदान नोंदणी व या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा”.
यावेळी सिनेट सदस्य प्रसन्नजीत फडणवीस,मा.उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे,उपाध्यक्ष पुणे शहर राजाभाऊ शेंडगे,मा.नगरसेविका वंदनाताई भिमाले,मा.पर्वती मतदारसंघ मा.अध्यक्ष हरीश परदेशी,प्रियांका शेंडगे सरचिटणीस युवमोर्चा पुणे,अभिषेक भिमाले सरचिटणीस युव मोर्चा पुणे ,श्री.रमेश बिबवे,श्री.गणेश शेरला,श्री.लहू जागडे, श्री.अनिल जाधव,संगीता चौरे,श्री.किरण वैष्णव श्री.प्रशांत डिकोळे,श्री. राजेंद्र काका देशपांडे,श्री.अभिजित देसरडा, प्रतीक भिमाले,राजवीर आव्हाड,श्री.संतोष भंडारी,सुशील लोंढे,विकास वैरागे,अनिकेत गायकवाड गणेश सुतार आदींसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते