पुणे(प्रतिनिधि)-: पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी दिवंगत आमदार विनायक निम्हण (आबा) यांचा मित्र परिवारही सरसावला आहे. माजी नगरसेवकर सनी निम्हण यांनी ‘चला भेटूया, मताधिक्य गाठूया’ हा स्नेहमेळ्याचं नुकतंच आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करून विकसित पुण्याचं स्वप्न गाठण्यासाठी महायुतीच्या पाठीशी मतदानरूपी भक्कम उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेटीगाठीसह नागरिकांच्या भेटीगाठीही घेतांना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्ष देखील मोहोळांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अशातच पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी माजी आमदार दिवंगत विनायक निम्हण यांच्या मित्र परिवाराचा चला भेटुया, मताधिक्य गाठुया स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
विनायक आबा निम्हण’ यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं याआधी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव अजूनही मतदारसंघात पहिल्या सारखा तसाच दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकर सनी निम्हण यांनी ‘चला भेटूया, मताधिक्य गाठूया’ हा स्नेहमेळ्याचं आयोजन केलं होतं.
यावेळी भाजप शहाराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, दत्तात्रय गायकवाड, बाबुराव चांदेरे, मुकारीअण्णा अलगुडे, श्री. दत्ताभाऊ सागरे, श्री. अमोल बालवडकर, विकासनाना दांगट, प्रकाश ढोरे, राघवेंद्रबापू मानकर, विनोद ओरसे, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, बोरावके काका, प्रितीताई शिरोडे, रोहिणीताई चिमटे, ॲड. नितीन कोकाटे, भगवानतात्या निम्हण, आबासाहेब सुतार, गोविंदशेठ रणपिसे, खंडूशेठ आरगडे, ज्ञानोबा निम्हण, अशोकराव मानकर, बाबाजी वाळुंज, भगवानराव कदम, मारुती कोकाटे, सुहास पटवर्धन, विकास रानवडे, समाधान शिंदे यांच्यासह स्व. आबांच्या मित्र परिवारतील विविध पक्षातील पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून आमदार सिद्धार्थ शिरोळे जोरदार प्रयत्न करतांना दिसत आहेत. मोहोळ यांच्या प्रचारासाठी शिरोळे मतदारसंघ पिंजून काढतांना दिसत आहेत. यावेळी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करतांना दिसत आहेत. अशातच शिरोळे यांनी अंकुरा हॉस्पिटल येथे भेट देऊन डॉक्टर व कर्मचारी यांच्यासोबत चाय पे चर्चा केली. तसेच विकसित भारतासाठी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मोहोळांना विजयी करण्याचेही त्यांनी आवाहन केले.