#Alandi Sfot: आळंदी येथील एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट : तिघांचा मृत्यू ; 19 जखमी

Massive explosion in aluminum plate manufacturing company in Alandi
Massive explosion in aluminum plate manufacturing company in Alandi

Alandi Sfot : आळंदी(Alandi) जवळ असलेल्या सोळू(Solu) गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत (aluminum plate manufacturing company ) गुरुवारी (दि. ८) सायंकाळी भीषण स्फोट(Sfot) झाला. या स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी आहेत. काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Massive explosion in aluminum plate manufacturing company in Alandi)

रामचंद्र मारुती निंबाळकर (वय ८१), संतोष त्रंबक माने (दोघे रा. सोळू), नवनाथ पांचाळ (वय ५५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

बेबीताई ठाकूर (वय ७०), नंदा संतोष शेळके (वय ३५), रणवीर विलास गावडे (वय ३),.चंद्रकांत बबन निंबाळकर (वय ७०), मोनू गौतम (वय २५), दिनेश रामकिसन मौर्य (वय २०), दीपक सदाशिव ठाकूर (वय ४७), गणेश रामचंद्र कोटंबे (वय ३६), श्रुती सोमनाथ ठाकूर (वय ४), विठ्ठल भाऊ ठाकूर (वय ७०), निवृत्ती लक्ष्मण ठाकूर (वय ६५), मनीषा बबन फुलशेटे (वय ३७), बसवराज बनसोडे (वय ४०), नागेश दिलीप ठाकूर (वय ३०), उमेश दिलीप ठाकूर (वय २६), शिवांश नागेश ठाकूर (वय ४), अमेंद्र रामविजय पासवान (वय २३), रणजीत हरिश्चंद्र पासवान (वय १९, सर्व रा. सोळू), अब्दुल कलाम खान (वय ५०, रा. चिखली) अशी जखमींची नावे आहेत.

अधिक वाचा  युग पुरुष दत्तोपंत ठेंगडी

गुरुवारी सायंकाळी कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाची दाहकता खूप असल्याने आजूबाजूच्या घरांना देखील तडे गेले. काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात बांधलेली जनावरे देखील भाजली गेली आहेत. तसेच जनावरांच्या गवताला देखील आग लागली.

सुमारे नऊ दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा स्फोट विद्युत रोहीत्रामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. मात्र रोहित्र सुस्थितीत असून त्यातून होणारा विजपुरवठा बंद होता. तसेच स्फोट झाल्यानंतर कंपनीची भिंत रोहित्रावर पडल्याने रोहीत्राचे खांब वाकले गेले. हा स्फोट रोहीत्रामुळे झाला नसल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले.

स्फोट झालेल्या कंपनीत एल्युमिनियम प्लेट बनवल्या जात होत्या. मात्र मागील चार वर्षांपासून कंपनी बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेत बाधित झालेल्या घरांचे पंचनामे तहसील कार्यालयाकडून केले जाणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love