#Governor Ramesh Bais : प्राथमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील -राज्यपाल रमेश बैस

Structural changes have to be made in primary education ​
Structural changes have to be made in primary education ​

Governor Ramesh Bais | New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणात (New Education Policy) उच्च शिक्षणाला (Higher Education) प्राधान्य देण्यात आले असून, देशातील प्राथमिक(Primary), माध्यमिक (Secondary) आणि उच्च माध्यमिक(Higher Secondary) शिक्षणातही रचनात्मक बदल (Constructive change in education) करावे लागतील, असे मत राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais) यांनी बुधवारी व्यक्त केले. (Structural changes have to be made in primary education)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ( Savitribai Phule Pune University) १२३ व्या पदवीप्रदान समारंभप्रसंगी( Graduation Ceremony) ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्रबुद्धे(Vinay Sahasrabuddhe), विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी ( Vice Chancellor Dr. Suresh Gosavi), प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर(Pro-Chancellor Dr. Parag Kalkar) , कुलसचिव डॉ. महेश काकडे(Registrar Dr. Mahesh Kakade), परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. विजय खरे(Dr. Vijay Khare) आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  प्रश्नसंचातील प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचा प्रकार उघडकीस

राज्यपाल म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षण, ही काळाची गरज आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्यावर भर असून, उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. उच्च शिक्षणाचे महत्त्व वाढत असताना देशातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातही आपल्याला रचनात्मक बदल करावे लागतील. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विविध विभागांनी अधिक संवेदनशीलतेने अभ्यासक्रम आणि नव्या शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करावे. 

ज्ञान केवळ माहितीचा संग्रह नसल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, ज्ञानाच्या आधारे नवसंस्कृती उभी राहते, ज्ञानामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो. ज्ञान नाविन्य आणि परिवर्तनाचे उत्प्रेरक आहे. ज्ञान माणसाला योग्य निर्णय घेण्यास सक्षम आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यायोग्य बनविते. ते प्रश्न विचारणे, विश्लेषण करणे आणि मूल्यांकन करण्यासाठी माणसाला प्रोत्साहित करते. ज्ञान वर्तमान आणि भविष्याला जोडणारा सेतू असल्याने उच्च शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करून विद्यार्थी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. 

अधिक वाचा  कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुशल मनुष्यबळाची खाण असून उद्याचे धोरण निर्माते आणि देशाचे नेतृत्व येथून घडेल, असेही राज्यपाल यांनी नमूद केले. 

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, सध्याच्या विद्यापीठीय वातावरणात संस्था बांधणी या विषयाची होत असलेली उपेक्षा संपविण्याची आणि नव्या आणि काल सुसंगत ज्ञाननिर्मितीसाठी अपारंपरिक पद्धतीची दृष्टी ठेवून नव्या ज्ञान विषयांवर काम करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठीय शैक्षणिक वर्तुळात अस्सल प्रागतिकतेचे संस्कार रुजविण्याचीदेखील गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love