जय श्रीराम
येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्येतील भव्य अशा श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. आज पासून त्या सोहळ्याची मंगल अक्षता आणि निमंत्रण देण्याचे अभियान सुरू झाले आहे.
यानिमित्ताने अनेक पिढ्यांचे आणि वर्षांचे स्वप्न साकार होत आहे. प्रत्यक्षात शेकडो वर्षे रामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष चालला, यामध्ये लाखो हिंदू बांधवांनी आपले योगदान दिलं प्राणार्पण सुद्धा केले. रामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष माहित झाला तरच हे राम मंदिर का स्वप्नवत वाटायचे हे लक्षात येऊ शकेल. आजपासून आपल्या पर्यंत हा प्रवास पोहोचविण्याचा एक प्रयत्न ….
संकलन डॉ.सचिन लादे
सादरकर्ते देवदत्त भिंगारकर