पुणे- भारताची चांद्रयान-३ ही मोहीम बुधवारी फत्ते झाली (India’s Chandrayaan-3 Mission Fatte) आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा पहिला देश (India became the first country to reach the South Pole of the Moon) म्हणून भारताने इतिहास रचला. भारत हा पहिला देश म्हणून इतिहास रचला गेला. भारताच्या या यशस्वी मोहिमेने संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच चांद्रयान-३ हे यान का उतरवले गेले किंवा दुसरे देशही चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवीय मोहिमेला का महत्व देतात याबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे. (What is the significance of the south pole of the moon?)
चंद्रावर पहिलं यान रशियानं लुना कार्यक्रमाअंतर्गत पाठवलं होतं, तर अमेरिकेच्या अपोलो कार्यक्रमाअंतर्गत पहिल्यांदाच माणसानं चंद्रावर पाऊल टाकलं. आता दक्षिण ध्रुवावर यान अलगद उतरवणारा म्हणजेच सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश बनला आहे.
ISRO चं चांद्रयान-३ हे यान बुधवारी (२३ ऑगस्टला) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात (साधारण 70 अक्षांश दक्षिण जवळ) उतरले आहे. याआधी चंद्रयान-१ मोहिमेतला इम्पॅक्ट प्रोब (Impact Prob) चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशातच धडकला होता. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान विक्रम लँडरनं (Vikram Lander) या प्रदेशात उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.दरम्यान, ११ ऑगस्टला अवकाशात झेपावलेलं रशियन अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसचं लुना-२५ हे यानही सोमवारी (२१ ऑगस्ट) लूना-२५ (Luna-25) हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र त्यापूर्वी शनिवारी त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. यानंतर हा बिघाड दुरुस्त कऱण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यातच हे लँडर चंद्रावर कोसळलं आणि रशियाचे स्वप्न भंगले. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे लक्ष लागले होते.
चंद्राचा दक्षिण ध्रुवच का?
रशिया, भारत एवढेच नाही तर २०२५ पर्यंत अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (nasa) आर्टेमिस मोहिमेअंतर्गत (Artemis Expeditions) दक्षिण ध्रुवीय प्रदेशात अंतराळवीर उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चीनही इथे आपलं यान पाठवण्याच्या तयारीत आहे. सर्व देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यान पाठविण्यासाठी का रस घेत आहे यामागे काही महत्वाची कारणे आहेत.
याआधीच्या बहुतांश चांद्रमोहिमांमध्ये चंद्राच्या विषववृत्तीय प्रदेशात यानं उतरवण्यात आली होती. त्यामध्ये नासाचं अपोलो मिशन आणि रशियाच्या लुना मोहिमांचा समावेश आहे. ही यानं चंद्राच्या विषववृत्ताजवळच्या प्रदेशात उतरली कारण तिथे यान उतरवणं हे तुलनेनं सोपं आणि सोयीचं मानलं जातं. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यप्रकाश जरा जास्त काळ उपलब्ध असतो, जो या यानांना काम करण्यासाठी गरजेचा असतो.
पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी कललेला आहे. त्यामुळेच पृथ्वीवर उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंचा अनुभव घेता येतो, तसंच यामुळे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र अशी स्थिती अनुभवता येते.
चंद्राचा अक्ष सूर्याच्या जवळपास काटकोनात म्हणजे केवळ १,५ अंशांनी कललेला आहे. परिणामी चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश पोहोचला तरी तिथल्या खोल विवरांच्या तळाशी तो पोहचू शकत नाही. त्यामुळे चंद्राच्या ध्रुवीय भागातील विवरांमधलं तापमान साधारण दोन अब्ज वर्षांपासून अतिशय थंड राहिलं आहे.
या विवरांना माणसानं नावंही दिली आहेत. चंद्राचा भौगोलिक दक्षिण ध्रुव शॅकल्टन नावाच्या विवरात आहे. याशिवाय दक्षिण ध्रुवीय प्रदेशात शुमेकर, डी गरलॅश, स्वेरड्रप, हॉवर्थ ही विविरं आहेत. सूर्यप्रकाशापासून दीर्घकाळ दूर राहिलेल्या यातल्या अनेक विवरांना ‘कायमचे अंधारातले प्रदेश’ (permanently shadowed regoions) म्हणून ओळखलं जातं.
अशा ठिकाणी तापमान शून्यापेक्षा २३० अंश कमी एवढं थंड असू शकतं. या गोठलेल्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यमाला, पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीची रहस्यं दडलेली असू शकतात. कारण सूर्यप्रकाशापासून दूर अशा इथल्या मातीत करोडो वर्षात मोठे बदल झाले नसल्याची शक्यता आहे. जवळपास दोन अब्ज वर्ष अंधारात आणि थंड वातावरणात असलेल्या इथल्या मातीमध्ये बर्फाचे रेणू सापडतात का याचा तपास चंद्रयान-३ करेल.
भारताच्या चंद्रयान-1 मोहिमेतच चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याचं अस्तित्व आहे, हे सिद्ध झालं होतं. चंद्रयान-१ या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या शॅकलटन विवरात मून इम्पॅक्ट प्रोब नियंत्रितपणे आदळवला होता.त्यावेळी त्यासोबत जोडलेल्या उपकरणांनी चंद्रावर गोठलेल्या स्वरुपात म्हणजे बर्फाच्या स्वरुपात पाण्याचे कण असल्याची नोंद केली होती. आता चंद्रयान-३ आणि इतर मोहिमा या बर्फाच्या कणांचा प्रत्यक्ष अभ्यास करू शकतील.
तुलनेनं चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश कोरडा आहे, तिथल्या पृष्ठभागावर पाणी अजिबात उपलब्ध नाही, हे आधीच्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. चंद्रयान-३ ला दक्षिण ध्रुवावरच्या गोठलेल्या मातीमध्ये पाण्याचा अंश प्रत्यक्षात सापडला, तर त्याचा भविष्यातील मोहिमांना मोठा फायदा होऊ शकतो. चंद्रावर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी असेल आणि ते काढता येणं सहज शक्य असेल तर या उपग्रहावर मानवी वस्ती उभी करणं शक्य होईल.
या पाण्यातून चंद्रावर ऑक्सिजन आणि हायड्रोजनची निर्मिती करता येणंही शक्य आहे. या ऑक्सिजनमुळे चंद्रावर दीर्घकाळ वस्ती करणं सोपं होऊ शततं तर हे वायू म्हणूनही वापरता येतील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील सिलिकॉन लोह मॅग्नेशियम कॅल्शियम अल्युमिनियम मॅनेज टायटेनियम अशा खनिजांचे मोठे साठे असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.चंद्रयान- 3 आणि पुढचा मोहिमांमध्ये याचाही अभ्यास केला जाईल.