३ए कंपोझिट्सच्या फ्लॅगशिप ब्रँड अल्युकोबॉन्डचे अलुकोड्युअल’ हे प्रीमियम उत्पादन सादर

३ए कंपोझिट्सच्या फ्लॅगशिप ब्रँड अल्युकोबॉन्डचे अलुकोड्युअल' हे प्रीमियम उत्पादन सादर
३ए कंपोझिट्सच्या फ्लॅगशिप ब्रँड अल्युकोबॉन्डचे अलुकोड्युअल' हे प्रीमियम उत्पादन सादर

पुणे : उच्च दर्जाच्या ॲल्युमिनियम कंपोझिट्स सामग्रीचे अग्रगण्य व जागतिक उत्पादक असलेल्या स्वित्झर्लंडस्थित 3ए कंपोझिट्सचा प्रमुख ब्रँड अलुकोबॉन्डने तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट, आधुनिक अशा क्लॅडिंग सोल्यूशन्सच्या  प्रमुख पोर्टफोलिओला चालना देण्यासाठी ‘अलुकोड्युअल’ नावाचे  नाविन्यपूर्ण उत्पादन सादर केले आहे. ‘अलुकोड्युअल’ हे कंपनीकडून विविध आर्किटेक्टचरल रचना व वैशिष्ट्यपूर्ण  उपयोगांसाठी बनविलेले उत्पादन आहे.

पुण्याजवळील रांजणगाव येथील 3ए कंपोजझिट्सच्या अत्याधुनिक प्रकल्पात अलुकोड्युअल या उत्पादनाचे  संशोधन, रचना, विकास आणि निर्मिती झाली आहे. अलुकोड्युअल हे लॅमिनेटेड ॲल्युमिनियमच्या थरांसह प्री-कोटेड इंजिनियर्ड सॉलिड शीट आहे. याचा उपयोग मुख्यत्वे फसाड्स, क्लॅडिंग व कर्टन वॉल्स, आतील भिंती, छत, सोफिट आणि कॉलम्सच्या सजावटीसाठी करता येईल.

आर्किटेक्टचरल दृष्टिकोनातून क्लॅडींगसंबंधी गरजा, वापर आणि वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून, ‘परिपूर्ण सपाटपणा’ देण्याचे प्रमुख वैशिष्ट्य प्रदान करण्यासाठी अलुकोड्युअलची रचना करण्यात आली आहे, जे सामान्यतः स्टॅंडर्ड पोस्ट-कोटेड सॉलिड शीट्ससह साध्य करणे आव्हानात्मक असते. शिवाय, समान जाडीच्या ॲल्युमिनियमच्या एकाच शीटच्या तुलनेत, अलुकोड्युअल वाढीव कडकपणा  देतात. या संरचनात्मक स्थिरतेमुळे उत्पादनाचा वापर मोठ्या कॅसेट आणि पॅनेलमध्ये केला जाऊ शकतो, ज्यामुळे सांध्यांची संख्या आणि एकूण खर्च प्रभावीपणे कमी होतो. हे उत्पादन अधिक आणि गुंतागुंतीच्या ‘ऑन-साइट’ लागणाऱ्या क्लॅडिंगच्या आवश्यकतांनुसार तयार केले गेले आहे. अलुकोड्युअलचे गंज-मुक्त असलेले मरीन ग्रेड अलॉय उत्पादनाला  दीर्घकालीन टिकाऊपणा देते.

अधिक वाचा  शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार?

3ए कंपोझिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजीत शर्मा म्हणाले, “अलुकोड्युअल हे आमचे पूर्णतः नवीन असे स्वदेशी संशोधन आणि विकसित केलेले ‘मेक-इन-इंडिया’ उत्पादन आहे, जे आता भारतात आणि जागतिक स्तरावर आणण्यास तयार आहे. अलुकोड्युअल आर्किटेक्ट्सना मोठमोठी स्ट्रक्चर्स तयार करण्यासाठी पातळ, मजबूत; तरीही सहजपणे आकार देता येईल अशा क्लॅडिंग सामग्रीची रचना आणि वापर करण्यास मदत करेल. यामुळे विमानतळ, शॉपिंग मॉल्स, स्टेडियम, गगनचुंबी व्यावसायिक आणि निवासी इमारती यासारख्या प्रकल्पांमध्ये वैविध्य व नावीन्यपूर्ण रचना करण्याची एक नवीन लाट येईल. आम्ही आमच्या भारतीय उत्पादन केंद्राला जगभरात, विशेषतः आशिया-पॅसिफिक आणि मध्य-पूर्व देशांना अलुकोड्युअलचा पुरवठा करण्यासाठी जागतिक केंद्र बनवत आहोत”.

अलुकोड्युअलमध्ये अग्निरोधक गुणधर्मही आहे. तसेच, हे उत्पादन थ्री – डी आकार आणि जटिल भौमितिक नमुने प्राप्त करण्यासाठी लागणारी कार्यक्षमता प्रदान करते. यामुळे विविध आर्किटेक्चरल उपयोगांसाठी ते वैविध्यपूर्णरित्या वापरता येईल. अलुकोड्युअल मेटॅलिक्स, सॉलिड फिनिशेसमध्ये व चैतन्यदायी रंगांत, तसेच ग्रोव्ह (वुड लूक), एनोडाइज्ड लूक, काँक्रीट लूक, ऑरगॅनिक्स एलिगन्स (सुपर ग्लॉसी म्यूटेड टोन) आणि कलरस्केप्स यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण  रंगांमध्ये आणि सरफेस रंगांत येते.

अधिक वाचा  हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश : आम्ही कुणालीही आमच्या मुली देत नाहीत : का म्हणाले असे शरद पवार?

सध्या, कंपनी आपल्या समर्पित आणि सुस्थापित विक्री जाळ्याच्या माध्यमातून या नवीन उत्पादनासह भारतातील प्रमुख बाजारपेठांमधील आर्किटेक्ट्स, विकासक आणि फॅब्रिकेटर्स यांच्यापर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love