सीमा वादाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी भारत-चीनची कोअर कमांडर स्तरावर चर्चा


दिल्ली–भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष ताबारेषेवरून सुरु असलेल्या संघर्षाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी कोअर कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. पूर्वेकडील लडाखमधील चुशुल येथे होणाऱ्या या चर्चेत प्रामुख्याने लष्कराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतून (एलएसी) माघार घेण्याच्या दुसर्‍या टप्प्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

३० जून रोजी भारत आणि चीनी सैन्यांदरम्यान झालेल्या तिसर्‍या कमांडर स्तरावरील तिसर्‍या चर्चेत सीमा वाद आणि सैन्य माघार घेण्यावर सहमती झाली होती. यावर, दोन्ही देशांनी प्रभावी उपाययोजना करून प्रगती केली आहे. गालवान व्हॅलीमधील चिनी सैन्याने आपापल्या स्थानांवरुन माघार घेतली आहे आणि भारतीय सैन्यदेखील आपल्या स्थानापासून मागे हटले आहे.

मंगळवारी लडाख येथे होणारी बैठक सकारात्मक होईल, अशी अपेक्षाही भारतीय लष्कराने व्यक्त केली आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्व लडाखच्या चुशूल येथे मंगळवारी भारत आणि चीनी सैन्याच्या दरम्यान कोर कमांडर स्तरावरची बैठक होईल.

अधिक वाचा  पौडजवळ हेलिकॉप्टर शेतात कोसळले : हेलिकॉप्टरच्या कॅप्टनसह चारजण जखमी

 यापूर्वी १० जुलै रोजी भारत आणि चीन यांच्यात सीमा विवादांवरून डब्ल्यूएमसीसीची १६ वी बैठक आयोजित केली गेली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) ताणतणाव कमी करून शांतता पूर्वस्थितीकडे जाण्याचा निर्णय या दोन्ही देशांनी घेतला होता. या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक उपस्थित होते.

गॅल्वान व्हॅली येथे झालेल्या हिंसक संघर्षात भारतीय सैन्याच्या २०  सैनिक शहीद झाले, तर चीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देश सतत संवाद साधण्याचा आग्रह धरत आहेत.सूत्रांच्या म्हणण्यानुसार पूर्व लडाखमधील एलएसीवर भारतीय आणि चिनी सैन्यांची माघार सुरूच आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love