महापौरांची कोरोनावर मात


पुणे–कोरोनाची लागण झालेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे स्वत: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट केले आहे.

मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी (४ जुलै) सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावली होती. त्यांना ताप आल्याने कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर गेले पाच दिवस उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

‘कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मन:पूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे.” असे मोहोळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  31 डिसेंबर संध्याकळी 5 ते १ जानेवारी रात्री 12 पर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद