दहावीचा निकाल ३१ जुलै पर्यंत तर १२वीचा निकाल १५ ते २० जुलै दरम्यान


हिंगोली—कोरोनाच्या संकटाचा यंदा १२वी आणि १० वी परीक्षांच्या निकालाही विलंब झाला आहे. मात्र, बहुप्रतीक्षेत असलेला निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीचा निकाल १५ ते २० जुलै या कालावधीत तर दहावीचा निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे, त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. १२वीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरूवात झाली होती. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू झाली. सुमारे १४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. देशात कोरोना व्हायरस दाखल होण्यापूर्वी १२ वीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. तर दहावीच्या परीक्षा सुरू होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने सर्व शाळा, महाविद्यालये तसेच परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. दहावीच्या परीक्षांचा भूगोल विषयाचा पेपर शिल्लक होता अखेर लॉकडाऊननंतर हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला.

अधिक वाचा  प्रश्नसंचातील प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचा प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पेपर तपासणीचे काम सुरू करण्यास काहीसा उशीर झाला. अनलॉक होण्यास सुरूवात झाल्यानंतर पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love