कोरोनाचा धसका घेऊन या कलाकारांनी सोडल्या मालिका; कोण आहेत असे कलाकार?


कोरोनाचा धसका घेऊन या कलाकारांनी सोडल्या मालिका; कोण आहेत असे कलाकार?

https://news24pune.com/?p=955

मुंबई(ऑनलाईन टीम)—कोरोनाचा जसा सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे तसाच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवरही परिणाम झाल आहे. परंतु, लॉकडाऊन नंतर  तब्बल चार महिन्यांनंतर पुन्हा मुंबईत मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे. सेटवर सर्व सुरक्षा उपाय अवलंबले जात आहेत. असे असूनही,  काही कलाकारांनी कोरोना विषाणूचा इतका धसका घेतला आहे की त्यांनी शो टाळणेच अधिक पसंद केले आहे. कोण आहेत असे कलाकार ज्यांनी कोरोनाच्या काळात शो सोडून दिले आहेत? जाणून घेऊ या ..

लोकप्रिय टीव्ही मालिका  ‘तेरा क्या होगा आलिया’ची मुख्य अभिनेत्री प्रियंका पुरोहितने हा शो सोडून दिला आहे.  आपल्या वैयक्तिक कारणांमुळे  हा शो सोडत असल्याचे तिने सांगितले होते. प्रियंका म्हणाली होती की, ‘या शोचा प्रमुख भाग झाल्यामुळे मला खूप आनंद होत होता परंतु  आईच्या आजारामुळे मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे कोणताही धोका पत्करण्याची माझी इच्छा नव्हती. जर शोचे शूटिंग सुरु असताना मी या विषाणूचा बळी पडले तर माझ्या आईलाही या विषाणूची लागण होईल अशी मला भीती वाटते.  गेल्या ऑक्टोबर महिन्यातच माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याने मी त्यांना मुकले आहे. 

अधिक वाचा  ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

 ‘कसौटी जिंदगी की 2′ चा  अभिनेता कुणाल ठाकूर यानेही शोला अलविदा केले आहे. अनलॉकनंतर तो सेटवर परत आलाच नाही. कुणालच्या दातांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. तो म्हणाला की, ‘दातांच्या शस्त्रक्रियेमुळे माझी प्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीत शूटिंगला जाणे योग्य होणार नाही. सर्व काही ठीक होईपर्यंत मी घरीच रहायचे ठरवले आहे.’

 ‘इश्क सुभान अल्लाह’  या मालिकेची अभिनेत्री तनिषा शर्मानेही हा शो सोडला आहे. हा कार्यक्रम सोडण्यामागे आपले व्यक्तिगत कारण असल्याचे तिने सांगितले होते. ती म्हणाली होती की, ‘लॉकडाउननंतर पुन्हा शूटिंग सुरू करण्याबाबत खूप संभ्रम निर्माण झाला होता. परंतु,याबाबत कुणीही मला योग्य सल्ला दिला नाही.  त्यामुळे मला चंदीगडहून मुंबईला येण्याची तारीख ठरवता आली नाही. माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला हा शो सोडावा लागला आहे. मी संबंधित चॅनलला माझा निर्णय सांगितला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनीही माझी समस्या समजून घेतली आहे.   

अधिक वाचा  ‘वागले की दुनिया’ मालिकेत ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणारी व्यक्तिरेखा साकार करताना डोक्यावरील संपूर्ण केस गळलेली अवस्था दाखवताना परिवा प्रणती भावुक झाली

 ‘कुमकुम भाग्य’मध्ये  आलियाची भूमिका साकारणारी शिखा सिंगनेही शोला निरोप दिला आहे. तिने कोरोना व्हायरसमुळे हा शो सोडला आहे. शिखा नुकतीच आई झाली आहे. अशा परिस्थितीत बाहेर जाणे हे मुलाच्या दृष्टीने योग्य नाही असे तिला वाटते. या कारणामुळे शिखाने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

 ‘शक्ती’ या मालिकेची  अभिनेत्री गौरी टोंकने सुद्धा या मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे. कोरोनामुळे गौरी आपल्या कुटुंबाला संकटात टाकू इच्छित नाही. तिला तीन वर्षाची मुलगी आहे, म्हणून तिला कोणताही धोका पत्करायचा नाहीये, असे तिने म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love