सोन्याने आजही खाल्ला भाव,चांदीच्या दरात घसरण


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—पन्नास हजार रुपये प्रतीतोळ्याची पातळी ओलांडल्यानंतर सोन्याच्या किंमतीने आज वायदे बाजारात पुन्हा भाव खाल्ला आहे. वायदे बाजारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 0.16 टक्क्यांनी वाढून 50,158 रुपये झाला आहे. दुसरीकडे वेगाने दर वाढलेल्या चांदीचा दर मात्र,   0.4 टक्क्यांनी  घसरून 60,870  रुपये प्रतिकिलोवर आला. याअगोदर पहिल्यांदाच, भारतातील सोन्याच्या  दराने वायदा बाजारात प्रति 10 ग्रॅम 50,000 ची पातळी ओलांडली आणि हा दर प्रती 10 ग्रॅमसाठी  50,199 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.

यंदा सोन्याच्या दरात झाली 28 टक्क्यांनी वाढ

यावर्षी आतापर्यंत भारतात सोन्याच्या किंमती 28 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे भारतात अंतर्गत मागणी कमी झाली आहे. चांदीबाबत सांगायचे झाल्यास मागील वेळी वायदे बाजारात चांदीचा दर आठ टक्क्यांहून अधिक उसळून 62,200 रुपये प्रतिकिलो पर्यंत आला होता, जो गेल्या सात वर्षांत सर्वाधिक होता.

अधिक वाचा  बिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सोन्याला मागणी कमी झाल्याने भारतातील अंतर्गत सोन्याचे व्यापारी बुधवारी  अंतर्गत  किमतीवर प्रति औंस पाच डॉलर्स पर्यंत सवलत देत होते. भारतामध्ये अंतर्गत सोन्याच्या किंमतींवर 12.5 टक्के आयात कर आणि तीन टक्के जीएसटीचा समावेश आहे. सोन्याला मागणी कमी झाल्याने भारताच्या सोन्याची आयात कमी झाली असून ती जूनच्या तिमाहीत वर्षाच्या तुलनेत ९६ टक्क्यांनी घसरली आहे.

कशामुळे वाढले सोन्याचे दर?

जियोजित फाइनेंशियल सर्विसेसच्या कमोडिटी रिसर्चचे प्रमुख हरेश वी यांनी सांगितले की, कोरोनाचे  वाढते संकट आणि अमेरिकन डॉलरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात झालेली घसरण यामुळे सोन्याच्या भावाला झळाळी आली आहे. नवे आर्थिक प्रोत्साहन आणि अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावामुळे वायदे बाजारात कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कमी झालेली मागणी आणि आणि मजबूत रुपयाचा देशांतर्गत दरावर परिणाम होऊ शकतो.

अधिक वाचा  अर्थसंकल्पातून रोजगारनिर्मितीला चालना:बांधकामासह विविध क्षेत्रांतून अनुकूल प्रतिक्रिया

जागतिक बाजारपेठेत किती आहे दर?

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव 0.3 टक्क्यांनी घसरून ते 1,865.84 प्रति औंस झाले, ज्याने नऊ वर्षातील उचांक गाठला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि डॉलरच्या किमतीत झालेली घसरण याचा हा परिणाम आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love